सोशल मीडियावर महिलांच्या हाणामारीचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये सीटवरुन महिलांमधील राड्याचे असंख्य व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकुळ घालत असतात. यातील काही व्हिडीओ तर ट्रेंडिंगमध्येही असतात. महिलांमध्ये कुठल्या ना कुठल्या कारणावरून वादा वादी आणि भांडण होतं असतात. या भांडण्याचं रुपांतर नंतर हाणामारीत होतं. कधी लोकल ट्रेनमध्ये तर कधी बसमध्ये तर कधी शाळेत…ठिकाण वेगवेगळे असले तरी या घटनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात.
Viral Video | लातूर बस स्थानकात महिला कंडक्टर आणि महिला प्रवाशात हाणामारी; सोशल माध्यमावर व्हिडिओ व्हायरल#viralvideo #latur #womenfight #marathinews #zee24taas
— Ramraje Shinde (@ramraje_shinde) July 30, 2023
नुकताच महिला वाहक आणि महिला प्रवाशाने बस स्थानकालाच कुस्तीचा आखाडा बनवल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. महिलांमधील ही हाणामारी बस स्थानकावर उपस्थित एका प्रवाशाने काढला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या महिला एकमेकांना मारताना दिसत आहे. किरकोळ वादातून ही हाणामारी सुरु झाली. या व्हिडीओमध्ये महिलांची हाणमारीला थांबविण्यासाठी अखेर इतर प्रवाशांना पुढाकार घ्यावा लागला. मारामारीचं नेमकं कारण काय झालं ते कळू शकलेले नाही. मात्र हा व्हिडीओ लातूर बस स्थानकातील असल्याचं बोलं जातं आहे.
(हेही वाचा Atiqe Ahmed : अतिक अहमदचा वकील विजय मिश्रा याला अटक)
Join Our WhatsApp Community