Scientist Kurulkar : शास्त्रज्ञ कुरुलकर देणार होता पाकिस्तानी ललनाला ब्राह्मोसचे रिपोर्ट; व्हॉट्सॲप चॅटमध्ये धक्कादायक खुलासा

124

हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर प्रकरणी महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाने मोठा खुलासा केला आहे. एटीएसने सांगितले की, प्रदीप कुरुलकरला ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रकल्पाचा गुप्तचर अहवाल पाकिस्तानच्या महिला गुप्तहेरला दाखवायचा होता. आरोपपत्रानुसार, प्रदीप कुरुलकर यांनी 19 ऑक्टोबर 2022 ते 28 ऑक्टोबर 2022 या कालावधीत ब्रह्मोस क्षेपणास्त्रासंदर्भात पाकिस्तानच्या महिला गुप्तहेरशी चर्चा केली होती.

प्रदीपला माहित होते की, ब्रह्मोसशी संबंधित माहिती गुप्त आहे आणि ती व्हॉट्सॲप किंवा ईमेलद्वारे दिली जाऊ शकत नाही. त्यामुळेच प्रदीपने झारा दासगुप्ता या पाकिस्तानी गुप्तहेरला भेटायला सांगितले होते. ब्रह्मोससंदर्भात दोघांमधील व्हॉट्सॲप चॅटचाही आरोपपत्रात उल्लेख करण्यात आला आहे.

(हेही वाचा Dengue : मुंबईत डेंग्यूचा बळी; महापालिकेची पडताळणी सुरु)

चार्जशीटनुसार, झाराने प्रदीपला विचारले होते, ब्रह्मोस देखील तुमचा शोध आहे का? उत्तरात, प्रदीप म्हणाला – होय, सर्वात धोकादायक शोध… माझ्याकडे 186 पानांचा प्राथमिक डिझाइन रिपोर्ट आहे. यात ब्रह्मोसच्या सर्व आवृत्त्यांची माहिती आहे.
यानंतर कुरुलकर झाराला सांगतात- मी तो रिपोर्ट ट्रेस करून तुझ्यासाठी तयार ठेवीन, तू इथे आल्यावर दाखवीन.

केवळ ब्रह्मोसच नाही तर कुरुलकर आणि झारा यांनी भारताच्या अग्नी 6, रुस्तम (मानवरहित हवाई वाहन), पृष्ठभागावरून हवाई क्षेपणास्त्र, मानवरहित लढाऊ हवाई वाहन आणि डीआरडीओच्या ड्रोन प्रकल्पांवरही चर्चा केली.

एटीएसने या प्रकरणातील गुप्त माहिती असलेली कागदपत्रेही सीलबंद कव्हरमध्ये न्यायालयासमोर सादर केली आहेत. कुरुलकरने ‘हॅपी मॉर्निंग’ नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर झाराला ॲड केल्याचेही आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. कुरुलकर यांनी झाराशी संवाद साधताना आणखी दोन शास्त्रज्ञांची नावे सांगितली होती. एटीएसने या दोन्ही शास्त्रज्ञांशी बोलणेही केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.