Governor appointed mlc : राज्यपाल नियुक्त आमदारांचे प्रकरण पुन्हा उच्च न्यायालयात
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचे प्रकरण मागच्या तीन वर्षांपसून खितपत पडलेले आहे. या प्रकरणी आता सोमवारी, ३१ जुलै रोजी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
जून २०२० पासून विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचे प्रकरण पेंडिंग आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणाच्या सुनावण्या झालेल्या आहेत. येत्या बुधवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. न्यायालयाच्या कचाट्यात सापडलेले हे प्रकरण उच्च न्यायालयात आले आहे. या प्रकरणातील मुख्य याचिकाकर्ते रतन सोली यांना याचिका मागे घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मुभा दिलेली होती. तर दुसरे याचिकाकर्ते सुनिल मोदी यांना उच्च न्यायालयात पुन्हा दाद मागयची असेल तर मागा, असे न्यायालयाने म्हटले होते.
त्यानुसार आता सुनिल मोदी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी सोमवारी होणार आहे. त्यामुळे सोमवारी न्यायालयात काय होतंय, त्यावर १२ आमदारांच्या नियुक्तीचे भविष्य अवलंबून आहे. तर सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीच्या निर्णयावर बुधवारी सुनावणी होईल. राज्यातील सत्ता बदलानंतर याबाबत एक वेगळी याचिका दाखल करण्यात आली होती. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून आधीची यादी परत पाठवली. हे कृत्य नियमात बसणारं नाही, असं सांगत न्यायालयात आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. आता त्यावर काय निर्णय येतो, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.