Eye Flu : पावसाळ्यात होणार्‍या आय फ्ल्यूपासून ’असा’ करा स्वतःचा बचाव

212

पावसाळा आला की साथीचे आजार पसरतात. काविळ, कॉलरा, हगवण यांसारखे कित्येक आजार पावसाळ्यात पसरतात. त्याचबरोबर डोळ्यांचेही आजार पसरतात. सध्या डोळ्यांच्या आजारांमध्ये ‘आय फ्ल्यू’ नावाचा आजार बऱ्याच प्रदेशांमध्ये वेगाने बळावतोय. या लेखामध्ये आम्ही तुम्हाला हा आजार कशामुळे होतो, कसा पसरतो आणि याला थांबवण्यासाठी काय करायला हवे ते सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात..

या आजाराला कंजक्टीवाईस सुद्धा म्हटले जाते. आय फ्ल्यू झालेल्या व्यक्तीला डोळ्यांची जळजळ, डोळे दुखणे आणि लाल होणे अशा तक्रारी होऊ लागतात. हा आजार विशिष्ट प्रकारच्या एलर्जीचे लक्षण असू शकतो. पण बहुतेक वेळेला काही जिवाणूंच्या संक्रमणामुळे सुद्धा हा आजार होऊ शकतो. श्वसनसंस्था, नाक किंवा कानामध्ये जर कोणत्याही प्रकारचे संक्रमण झाले असेल तरीसुद्धा हा आजार होऊ शकतो. सुरुवातीला एक डोळा या आजाराने बाधित होतो. त्यानंतर लवकरच दोन्ही डोळ्यांना हा आजार बाधतो.

(हेही वाचा मोदी-शहांचा विरोध करताना I.N.D.I.A आघाडीकडून भारतमातेचा अवमान; सोशल मीडियात टीकेची झोड)

पावसाळ्यात संपूर्ण वातावरणात एक दमटपणा भरून राहिलेला असतो. त्यामुळे फंगल इन्फेक्शनसारख्या अनेक समस्या उद्भवतात. त्याबरोबरच डोळ्यांचेही आजार वेगाने पसरतात. आय फ्ल्यू झालेल्या व्यक्तीचे डोळे लाल होतात, डोळ्यांतून पाणी येते, डोळ्यांची खूप जळजळ होते. तसेच डोळ्यांतून सतत चिकट द्रव स्रवत असतो. त्यामुळे डोळ्यांवर सूज येते. जर याचा वेळीच इलाज केला नाही तर हे इन्फेक्शन वाढून याचा डोळ्यांच्या दृष्टीवर देखील परिणाम होऊ शकतो.

जर तुम्हाला आय फ्लू चे संक्रमण झाले असेल तर डोळ्यांना सारखा सारखा हाताने स्पर्श करू नका. डोळे पुसण्यासाठी टिश्यू पेपर किंवा वाईपचा वापर करा. स्वच्छ कापड डोळे पुसण्याकरता वापरत असाल तर एकदा वापरलेले कापड पुन्हा वापरू नका. डोळ्यांना सतत स्वच्छ पाण्याने धूत राहा. तसेच कोणत्याही प्रकारचे संक्रमण झाल्यास सर्वात आधी डॉक्टरांकडे जाऊन त्यांचा सल्ला घ्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.