हल्ली AI म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून अशक्य वाटणारी गोष्टसुद्धा शक्य होऊ लागली आहे. हल्लीच मिळालेल्या माहितीनुसार पोलीस खात्यामध्ये गुन्हेगारांना ओळखण्यासाठी आणि त्यांना अटक करण्यासाठी AI टेक्नॉलॉजीचा वापर वाढलेला दिसून येत आहे. या टेक्नॉलॉजीमुळे गुन्हेगार नक्की कसा दिसतो, त्याचे लाईव्ह लोकेशन कोणते आहे यासारख्या गोष्टींचा शोध सहज लावणे शक्य झाले आहे.
त्यासाठी गुन्हेगारांचे सगळे डिटेल्स आधी पोलिसांच्या सिस्टीममध्ये जमा असणे गरजेचे आहे. त्यावरून कुठल्याही ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेराच्या साहाय्याने गुन्हेगाराची ओळख पटवून त्याचे लाईव्ह लोकेशन पोलिसांना सापडू शकते. त्यासाठी बुलेट कॅमेरा हा सगळ्यात प्रभावी माध्यम आहे. एखाद्या व्यक्तीला शोधायचे असल्यास त्याचे सगळे डिटेल्स सिस्टीममध्ये असले तर ते शोधण्यासाठी सिस्टीमला कमांड दिल्यास वेगवेगळ्या ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेराद्वारे ही सिस्टीम तुला व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न करते. बुलेट सीसीटीव्ही कॅमेरा लावला असेल तर त्याद्वारे त्या पर्टीक्युलर व्यक्तीचे फेशिअल रेटिना अचूक स्कॅन करून तो सिस्टीमकडे त्या व्यक्तीची माहिती पोलिसांकडे पाठवली जाते. अशाप्रकारे पोलिसांना गुन्हेगारांचे लाईव्ह लोकेशन अचूक कळते आणि ते त्यांना पकडू शकतात.
(हेही वाचा मोदी-शहांचा विरोध करताना I.N.D.I.A आघाडीकडून भारतमातेचा अवमान; सोशल मीडियात टीकेची झोड)
मागच्या काही दिवसांपूर्वी OTT प्लॅटफॉर्मला सुरू असणारी असुर नावाची गाजलेली सिरीज तुम्ही पहिली असेल. या सिरीजमध्ये एक सिरिअल किलर लोकांना मारण्यासाठी निवडायला कशाप्रकारे AI चा वापर करून त्यांचे सर्वप्रकारचे लहानमोठे डिटेल्स जाणून घेतो. तसेच पोलीसही या गुन्हेगाराचा छडा लावण्यासाठी AI चा किती चांगल्याप्रकारे वापर करून अखेर गुन्हेगाराला अटक करतात याचे चित्रण चांगल्याप्रकारे दाखवले आहे.
Join Our WhatsApp Community