Devendra Fadanvis : धर्मवीर आनंद दिघेंची परंपरा एकनाथ शिंदे चालवतात – देवेंद्र फडणवीस

135

धर्मवीर आनंद दिघे या संपूर्ण भागात सेवा कार्य करायचे, दुर्गम भागातील आदिवासी देखील त्यावेळी त्यांच्या अॅम्ब्युलन्स सेवेमुळे वाचला आहे. त्या काळात गोर-गरीब माणसाला सेवा मिळाली पाहिजे, हा प्रयत्न त्यांनी सातत्याने केला. एका राजकीय नेत्यापेक्षाही सेवा करणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. त्यांचीच परंपरा एकनाथ शिंदे यांनी चालवली. बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं त्याप्रमाणे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या सूत्रातून हे कार्य होतंय, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर रुग्णालय आणि त्रिमंदिर संकुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमात  ते बोलत होते.

अजय आशर यांच्याकडून ‘जितो’च्या माध्यमातून चांगलं काम होतंय. कॅन्सर रुग्णालय बनवायला घेतलं आहे. यांच्या पाठीमागे जितो आहे, ज्यांच्या पाठिमागे जैन समाज आहे त्यांना संसधानाची गरज पडत नाही. देशाचा जीडीपी जैन समाजाजवळ आहे. त्यांच्या श्रमातून, त्यांच्या मेहनतीतून उभा केला आहे. केवळ पैसा कमवायचा नाही तर ते पैसा सेवेमध्ये द्यायचा, असं प्रिन्सिपल जैन समाजामध्ये पाहायला मिळतं. त्यामुळे देशभरामध्ये, खूप मोठ्या प्रमाणात सेवाकार्य होतं”, असंही फडणवीस म्हणाले.

(हेही वाचा मोदी-शहांचा विरोध करताना I.N.D.I.A आघाडीकडून भारतमातेचा अवमान; सोशल मीडियात टीकेची झोड)

“कॅन्सर एक असा रोग आहे, दुर्दैवाने या रोगामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होतेय. गेल्या दहा वर्षांत कॅन्सरच्या रुग्णांमध्ये २५ टक्क्यांची वाढ झाली, तर मृतांमध्ये २० टक्क्यांची वाढ झाली आहे. २०३५ पर्यंत कॅन्सरच्या केसेस मोठ्या प्रमाणात वाढतील. जगात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत जास्त किलर रोग कॅन्सर आहे. कॅन्सर हा व्यक्तीला होतो, पण त्रास परिवाराला होतो. लांब आणि खर्चिक ट्रिटमेंट असते. त्यामुळे परिवाराचं आर्थिक संतुलन बिघडतं. देशाच्या श्रमशक्तीवरही याचा विपरित परिणाम होतो. आज अभिमानाची गोष्ट आहे टाटा कॅन्सरसाखं हॉस्पिटल मुंबईत आहे, त्यांनी अविरत सेवा दिली. ते केवळ सेवा करतात असं नाही, देशात कुठेही कॅन्सर हॉस्पिटल सुरू करायचं असेल तर सर्व प्रकारची मदत टाटा रुग्णालयाकडून केली जाते. याही ठिकाणी कॅन्सर हॉस्पिटल सुरू होतंय, ते टाटाच्या मार्गदर्शनाखाली तयार होतंय. आस्था आणि मानवतेचं मंदिर आजूबाजूला होतंय. त्रिमंदिरातून आस्था, श्रद्धा, विश्वास आणि ताकद मिळेल. दुसरीकडे कॅन्सर रुग्णालयातून उपचार मिळेल. या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आलेला रुग्ण बरा होऊनच जाईल, अशी प्रार्थना करतो, असे फडणवीस म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.