आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वेची (Western Local Train) वाहतूक विस्कळीत झाल्याने नोकरदारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सकाळपासून पश्चिम रेल्वे १५ ते २० मिनिटं उशिराने धावत आहे.
(हेही वाचा – Ajit Pawar : पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच; अजित पवार पुण्यावर ठाम; राष्ट्रवादीला आपल्याकडचे जिल्हे सोडण्यास शिवसेनेचा नकार)
मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवलीहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या सर्व लोकल (Western Local Train) १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. त्याची माहिती सर्व रेल्वे प्लॅटफॉर्मवरच दिली जात आहे. तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक विस्कळीत झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दुसरीकडे रेल्वे फलाटावर प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये सततच्या पावसामुळे लोकल सेवेवर (Western Local Train) परिणाम झाला होता. पावसामुळे काही मार्गावर लोकल सेवा काही तासांसाठी बंद होती. तर काही मार्गांवर लोकल उशिराने धावत होत्या. त्यावेळी सुद्धा प्रवाशांचे हाल झाले होते. आता पाऊस नसूनही पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community