एकीकडे भाज्यांचे भाव गगनाला भिडले असतांना दुसरीकडे कच्च्या तेलाच्या (crude oil) किंमतींत घसरण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (crude oil) किमतींमध्ये आज थोडी घसरण झाली आहे. त्यामुळे डब्ल्यूटीआय क्रूड 0.15 डॉलरने खाली येऊन प्रति बॅरल 80.43 डॉलरला विकले जात आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड 0.09 डॉलर खाली येऊन प्रति बॅरल 84.90 डॉलर विकले जात आहे. तर दुसरीकडे, सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे वाईन दर जाहीर केले आहेत. मे २१, 2022 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाला होता. मात्र आज काही राज्यांमध्ये इंधनाचे भाव किंचित कमी झाले आहेत तर बहुतेक राज्यांमध्ये दर स्थिर आहेत.
(हेही वाचा – Jaipur Express Firing : जयपूर एक्स्प्रेसमध्ये रेल्वे पोलिसांकडूनच गोळीबार; ४ जणांचा मृत्यू)
आज अनेक राज्यांमध्ये (crude oil) पेट्रोल 100 रुपयांच्या वर विकले जात आहे. दरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा मिळूनही ओडिशा, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये डिझेल अजूनही 100 रुपयांच्या वर विकले जात आहे. बिहार, केरळ, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, पंजाब, मणिपूर, पश्चिम बंगाल, सिक्कीम, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या वर विकले जात आहे.
‘या’ चार राज्यांतील इंधनाचे दर
– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
– कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.73 रुपये आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर
हेही पहा –
Join Our WhatsApp Community