मुंबईच्या पश्चिम उपनगरातल्या खारमध्ये रविवार ३० जुलै रोजी पतीने पत्नीवर भररस्त्यात चाकुने वार केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात पत्नी गंभीररित्या जखमी झाली असून तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. वार करुन आरोपी पती घटनास्थळावरुन फरार झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे जोडपे धारावी पट्ट्यातील रहिवासी आहेत. दोघांचे वैवाहिक आयुष्य फारसे सुरळीत नव्हते. त्यांच्यात वाद सुरु होते. शिवाय त्यांनी न्यायालयाचे दार ठोठावले.
रस्त्यात भांडण झाले आणि पतीने पत्नीच्या गळ्यावर केला वार…
रविवारी रात्री धारावीच्या शाहू नगर परिसरातून हे जोडपे खार इथे फिरायला गेले असता त्यांच्यात पुन्हा भांडण झाले. दोघांमधली वादावादी वाढली. रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. त्याचवेळी आरोपी पतीने त्याच्याजवळील पेपर कटरने पत्नीवर हल्ला केला आणि तिच्या गळ्यावर वार केले. यानंतर तो तिला रक्तबंबाळ अवस्थेत सोडून पळून गेला.
(हेही वाचा – Teacher Exam : शिक्षक प्रेरणा परीक्षेवर शिक्षकांचाच बहिष्कार, अनेक परीक्षा केंद्रांवर शुकशुकाट)
रागाच्या भरात हल्ला की हत्येचा कट?
दरम्यान, पतीकडे चाकू नेमका कुठून आला? हा गुन्हा रागाच्या भरात घडला की पत्नीची हत्या करण्याचा आरोपी पतीचा कट होता? या संदर्भात आता अधिक तपास खार पोलीस करत आहेत. तर महिलेच्या सुरक्षेसाठी पोलिसांची एक टीम हॉस्पिटलमध्ये तैनात करण्यात आली आहे, असेही पोलिसांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community