भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने झाले. यातील पहिला सामना भारताने आपल्या नावावर केला तर दुसऱ्या सामन्यात संघाला हार पत्कारावी लागली.
या दुसऱ्या सामन्यात भारताचा ६ विकेट्स राखून पराभव करत विंडीजने मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. या पराभवामुळे टीम इंडियावर सर्वच स्तरांतून टीका होत असताना माजी खेळाडू व्यंकटेश प्रसाद यांनी देखील संपूर्ण संघाची कानउघडणी केली.
Despite the money and power, we have become used to celebrating mediocrity and are far from how champion sides are. Every team plays to win and so does India but their approach and attitude is also a factor for underperformance over a period of time.
— Venkatesh Prasad (@venkateshprasad) July 30, 2023
(हेही वाचा – Crime News : पतीचा पत्नीवर चाकू हल्ला, वार करुन पती फरार)
काय म्हणाले व्यंकटेश प्रसाद?
व्यंकटेश प्रसाद म्हणाले की, ‘कसोटी क्रिकेटचा अपवाद वगळता इतर दोन फॉरमॅटमधील टीम इंडियाची कामगिरी ही अत्यंत सुमारच राहिली आहे.’ ‘भारताला बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्ध वनडे मालिका गमावावी लागली. टीम इंडियाने गेल्या टी २० वर्ल्डकपमध्ये देखील सुमार दर्जाची कामगिरी केली. आपण ना इंग्लंडसारखा उत्साही संघ आहोत ना ऑस्ट्रेलिया सारखा आक्रमक संघ आहोत.’
व्यंकटेश प्रसादच्या मते, भारताने आपल्या वृत्तीत आणि दृष्टीकोनात बदल करुन मोठे यश मिळवण्यासाठी लक्ष केंद्रित केले पाहिजे. व्यंकटेश प्रसाद आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हणतात की, ‘पैसा आणि पॉवर असूनही आपल्याला छोट्या मोठ्या यशात समाधान मानायची सवय लागली आहे. आपण एक चॅम्पियन टीम बनण्याच्या खूप दूर आहोत.’
हेही पहा –
Join Our WhatsApp Community