पावसाळ्यात मच्छरांची पैदास मोठ्या प्रमाणात होते. आता मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण वाढत असताना ताप आणि सांधेदुखीकडे दुर्लक्ष करू नका असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. सांधेदुखी डेंग्यूचे लक्षण असू शकते, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. जुलै महिन्यात एकट्या मुंबईत डेंग्यूचे १०६ रुग्ण सापडले आहेत. मलेरियाच्या तुलनेत डेंग्यू जास्त घातक आजार मानला जातो, त्यामुळे डेंग्यूच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.
डेंग्यूबाधित बरीच रुग्ण सांधेदुखीकडे दुर्लक्ष करतात. परिणामी डेंग्यूचे निदान होण्यासही अवलंब होतो. दहा टक्के डेंग्यूबाधित रुग्णांच्या उपचारात बऱ्याच समस्या उद्भवतात. रुग्णाला हेपेटायटीस होण्याचीही भीती असते. डेंग्यूचा डास एडीस इजिप्ती मादी डासाच्या चाव्यामुळे होतो. एडीस डास दिवसाही फिरत असतो.
डासाचा चावा टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे असते. डेंग्यूबाधित रुग्णांना रुग्णालयीन उपचारांची गरज असते. डेंग्यूच्या उपचारात दिरंगाई केल्यास हिरड्यातूनही रक्त येते. कित्येकदा यकृतही खराब होते. दोन दिवसांपेक्षाही जास्त दिवस ताप राहिल्यास डॉक्टरांकडे उपचार सुरु करा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
(हेही वाचा – Crude Oil : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण)
डेंग्यूची लक्षणे –
- ताप येणे.
- तीव्र डोकेदुखी.
- डोळ्यांमध्ये वेदना होणे.
- भूक न लागणे.
- छातीवर पुरळ येणे.
- मळमळणे आणि उलट्या.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community