फोर्ट रुग्णालयातील कामा या जे जे रुग्णालयाशी संलग्न रुग्णालयात २४ तासांत तीन गरोदर महिलांनी जुळ्यांना जन्म दिल्याची आश्चर्यकारक घटना घडली. कामा रुग्णालयात एकाच दिवशी तीन गरोदर महिलांनी जुळ्या मुलांना जन्म देण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. या घटनांचा आलेख आश्चर्यकारक असला तरीही गेल्या काही वर्षांपासून जुळ्या मुलांच्या जन्माचे प्रमाण वाढत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
कामा रुग्णालय स्त्रीरोग, बालरोग आणि प्रसूतीसाठी राखीव ठेवले जाते. कामा रुग्णालयात दर दिवसाला दहा ते वीस प्रसूत्या होतात. महिलांची नॉर्मल प्रसूती करण्याकडे आमचा कटाक्ष असतो. जुळी मुले असली तरीही महिलांची प्राधान्याने नॉर्मल प्रसूतीकेली जाते. २६ जुलै रोजी सुमय्या मोमीन या महिलेने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. त्यांना एक मुलगा आणि मुलगी झाली. दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही बालके मोनोकोरियोनिक प्रकारातील जुळी बालके असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
(हेही वाचा – Facial Recognition Technology द्वारे पटणार गुन्हेगारांची ओळख)
दुसऱ्या घटनेत प्रसूतीचे दिवस पूर्ण होण्याअगोदरच वसीफा चोप्रा या महिलेने दोन जुळ्यांना जन्म दिला. त्यापैकी एका नवजात बालकाची प्रकृती नाजूक आहे. या बालकाला नवजात बालक अतिदक्षता विभागात ठेवल्याची माहिती दिली गेली. तिसऱ्या गर्भवती महिलेने २७ जुलै रोजी दोन मुलींना जन्म दिला. त्यांची प्रकृती उत्तम आहे. या तिन्ही घटनांच्या आधारे आगामी काळात जुळ्या मुलांच्या जन्माचे प्रमाण उत्तरोत्तर वाढत जाणार असल्याची माहिती प्रसूतीरोगतज्ञांनी दिली. याबाबतीत नेमके कारण सांगता येत नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community