पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे उद्या (१ ऑगस्ट) पुण्यात एकाच मंचावर येणार आहेत. यामुळे विरोधक आणि महाविकास आघाडीमध्ये खळबळ उडाली आहे. अनेकांनी शरद पवार यांच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. अशातच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील पवारांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
खासदार संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपली नाराजी व्यक्त केली आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
जनतेच्या मनात संभ्रम करणाऱ्या भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेऊ नये, असे आवाहन करत संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या भूमिकेवर अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली आहे. संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना उद्देशून हे विधान केले असले तरी त्यांच्या विधानाचा संपूर्ण रोख हा शरद पवार यांच्या दिशेनेच आहे. पुण्यातील कार्यक्रमाला शरद पवार जाणार आहेत. या कार्यक्रमात मोदीही असणार आहेत, म्हणून संभ्रम निर्माण होणार असल्याचे राऊत यांना म्हणायचे असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांनी शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवारांनी पंतप्रधान मोदींसोबत एकाच मंचावर उपस्थित राहू नये. शरद पवार जर कार्यक्रमाला उपस्थित राहिले तर देशात वेगळा संदेश जाईल, असे कुमार सप्तर्षी यांनी शरद पवार यांना भेटून सांगितले. अशातच शरद पवार कार्यक्रमाला जाण्यावर ठाम असल्याचा दावा करण्यात आला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community