Himachal Pradesh : मुसळधार पावसामुळे १८७ जणांचा मृत्यू तर ८ हजार कोटींचे नुकसान

गेल्या ७५ वर्षांतील सर्वात मोठा विध्वंस

142
Himachal Pradesh : मुसळधार पावसामुळे १८७ जणांचा मृत्यू तर ८ हजार कोटींचे नुकसान

यावर्षी झालेल्या पावसामुळे हिमाचल प्रदेशचे (Himachal Pradesh) सर्वाधिक नुकसान झाले आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापनानुसार आतापर्यंत १८७ जणांचा मृत्यू झाला असून, ३४ लोक बेपत्ता असून २१५ जण जखमी झाले आहेत.

राज्यात (Himachal Pradesh) ७०२ घरांचे पूर्णत: नुकसान झाले आहे, तर ७१६१ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. पाऊस आणि पुरात २४१ दुकाने वाहून गेली आहेत. तर तीन राष्ट्रीय महामार्गांसह ६५० हून अधिक रस्ते बंद आहेत.

हिमाचल प्रदेशचे (Himachal Pradesh) मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू म्हणाले की, “गेल्या ७५ वर्षांतील राज्यातील हा सर्वात मोठा विध्वंस आहे. पावसामुळे राज्याचे आठ हजार कोटी रुपयांपर्यंत नुकसान झाले आहे.”

(हेही वाचा – Sanjay Raut : शरद पवारांच्या भूमिकेवर संजय राऊतांची नाराजी; म्हणाले ‘संभ्रम निर्माण करू नका’)

‘या’ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल

हिमाचल, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, गोवा, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश.

‘या’ राज्यांमध्ये पावसाची शक्यता नाही

उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, दिल्ली, पश्चिम राजस्थान, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.