नर्मदेच्या काठावर वसलेल्या नेमावरमध्ये सोमवार, ३१ जुलै रोजी सकाळी जवळच्या गावातील ३५ कुटुंबातील १९० मुसलमानांनी हिंदू धर्मात घरवापसी केली आहे. ही सर्व कुटुंबे भटक्या समाजातील आहेत. या कुटुंबांच्या पूर्वजांनी पूर्वी काही कारणास्तव इस्लाम धर्म स्वीकारला होता, परंतु तरीही ते कुलदेवी चामुंडाची पूजा करत असत. लग्नाची पद्धतही हिंदू कुटुंबांसारखीच होती.
हिंदू धर्मात परतल्याचा अनुभव सांगताना, राम सिंग (पूर्वीचे मोहम्मद शाह) म्हणाले की, आमचे पूर्वज परिस्थितीमुळे मुस्लिम झाले असावेत. पण आमच्या रक्तात फक्त हिंदू रक्तच वाहत आहे. आज आम्हाला आमच्या मूळ धर्मात घरवापसी करतांना खूप आनंद होत आहे. नेमावारचे संत श्री रामस्वरूप दास जी शास्त्री आणि रतलामचे संत श्री आनंद गिरी जी महाराज या कार्यक्रमाला उपस्थित होते. हिंदू धर्मात घरवापसी करताना सर्वांनी सोहळ्यात मुंडन आणि नर्मदा स्नान केले. त्यानंतर हवन संपन्न झाले. यावेळी ५५ पुरुषांनी आणि ५० स्त्रियांनी हिंदू धर्म स्वीकारला.
(हेही वाचा Manipur Violence : मणिपूरच्या घटनेवर सरन्यायाधीश म्हणाले, ही पहिलीच घटना नाही, दोन्ही बाजू समजून घेणार)
Join Our WhatsApp Community