एक बांगलादेशी नागरिक, शिवाजी नगर परिसरात येणार असल्याची दहशतवाद विरोधी पथकाला मिळालेल्या माहितीवरून, संशयित व्यक्ती लाल शर्ट आणि निळी जीन्स परिधान करून २५ जुलै रोजी दुपारी लोटस कॉलनी रोडजवळ येणार आहे. त्यानुसार एटीएस पथकाचे कर्मचारी आणि शिवाजी नगर पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले. सापळा रचण्यात आला आणि शुकूरला अटक केली.
चौकशीदरम्यान आरोपीने तो बांगलादेशातील नरेल जिल्ह्यातील असल्याचे कबुल केले. त्यानंतर, शेखने कबूल केले की त्याने जेव्हा भारतात प्रवेश केला, तेव्हा त्याच्याकडे पासपोर्ट किंवा व्हिसा नव्हता, तसेच त्याने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी घुसखोरी केली होती. बांगलादेशातील गरिबीमुळे त्याचे कुटुंबीय उपाशी आहे, म्हणून त्यांना आधार द्यायचा होता आणि त्यामुळे त्याने भारतात प्रवेश केला. गेल्या दोन वर्षांपासून तो बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी नोकऱ्या करत होता, असेही त्याने सांगितले.
आणखी एका प्रकरणात, भायखळा पोलिसांच्या एटीएस पथकाने शनिवारी माझगाव परिसरातून एका महिलेसह चार बांगलादेशी घुसखोरांना अटक केली. ‘वसीम मोरोल’, ‘सलीम अली’, ‘सलमान अशरफ शेख’ आणि ‘सुलताना’ अशी या चौकडीची ओळख पटली.