पावसाने आता चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे घराघरांमध्ये डासांनी थैमान घातलं आहे. डासांमुळे डेंग्यू, मलेरियासारखे गंभीर आजारही होतात. अशात डासांना पळवण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. पण डास पूर्णपणे पळत नाहीत. डास झाडांमुळेही वाढतात. मात्र, अशीही काही झाडे असतात ज्यांच्या मदतीने तुम्ही डास पळवून लावू शकता. ही झाडे जर तुम्ही तुमच्या बाल्कनीत किंवा अंगणात लावलीत तर डास नक्कीच कमी होतील.
लॅव्हेंडर
लॅव्हेंडरचा सुगंध हा डासांना तुमच्या घरात येण्यापासून रोखतो. जांभळ्या रंगाचं फूल असलेलं हे झाड उन्हाळ्यात सहज मिळतं. हे झाड तुम्ही तुमच्या घराच्या बाल्कनीत लावू शकता.
पेटूनिया
पेटूनिया हे एक फारच आकर्षक फूल आहे जे तुम्ही अनेकदा कुठेना कुठे पाहिलं असेल. हे फूल बाराही महिने उगवतं. या फुलाला नैसर्गिक किटकनाशकही म्हटलं जातं. या फुलाचं झाड तुमच्या घराच्या आवारात किंवा घरात लावल्यास डास कमी येतील.
(हेही वाचा Congress : शरद पवारांनी पंतप्रधान मोदींच्या सत्कार सोहळ्याला जाऊ नये म्हणणारी काँग्रेस बॅकफूटवर)
सिट्रोनेलो
सिट्रोनेला ही एक सुगंधी वनस्पती आहे. या वनस्पतीपासून तयार करण्यात आलेल्या अगरबत्तीही तुम्हाला बाजारात सहज उपलब्ध होतील. या वनस्पतीच्या मदतीने डास पळवता येऊ शकतात. कारण या वनस्पतीच्या वासामुळे डास पळतात. त्यांना या वनस्पतीचा वास सहन होत नाही. ही वनस्पती तुम्ही तुमच्या अंगणात किंवा बाल्कनीमध्ये लावू शकता.
पुदीना
तसा तर पुदीन्याचा वापर खाण्याच्या पदार्थांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. त्यासोबतच पुदीन्याचा वापर वेगवेगळ्या रोगांसाठीही केला जातो. याच पुदीन्याचं रोप तुम्ही घरात लावल्यास डासांपासून सुटका मिळवू शकता.
लेमनग्रास
लेमनग्रास हे साइट्रोनला या प्रजातीचं गवत आहे. ज्या ठिकाणी लेमनग्रास असते त्या ठिकणी डास जास्त काळ राहू शकत नाहीत.
Join Our WhatsApp Community