राज्यात गेल्या काही दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावली होती. यामध्ये अनेक जणांची आर्थिक, आणि जीवित हानी झाली. तर दुसरीकडे राज्यातील अनेक भागांतील ओढे, नाले आणि नद्या दुथडीभरुन वाहत आहेत. जुलै महिन्यात झालेला मुसळधार पाऊस ऑगस्ट महिन्यात सुट्टीवर जाणार असल्याचे दिसत आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण ऑगस्ट महिन्यात पावसाच्या तुरळक सरी कोसळणार आहेत. पुढील दोन दिवसांसाठी राज्याच्या कोणत्याही जिल्ह्यांना रेड किंवा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नाही. मात्र अजूनही काही जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असून, त्या भागांमध्ये पावसाच्या मध्यम ते तुरळक सरी बरसतील असेही सांगण्यात आले आहे.
(हेही वाचा – Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर शहापूरजवळ काम सुरु असतांना मोठा अपघात; आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू)
तर, देशात जुलै महिन्यांत सरासरीपेक्षा १३ टक्के अधिक पाऊस झाला आहे. मात्र, देशभरात मोसमी पावसाला पोषक स्थिती नसल्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत सरासरीपेक्षा कमी म्हणजे ९२ टक्के पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community