माहीम मच्छीमार नगर ते पश्चिम द्रुतगती महामार्गाचा प्रवास होणार सुलभ…

माहीम खाडीवरून थेट पूल

247
माहीम मच्छीमार नगर ते पश्चिम द्रुतगती महामार्गाचा प्रवास होणार सुलभ...
माहीम मच्छीमार नगर ते पश्चिम द्रुतगती महामार्गाचा प्रवास होणार सुलभ...

माहिममधून वांद्र्याला जाणाऱ्या रस्त्यावर धिम्या गतीने होणारी वाहतूक आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता माहिम सेनापती बापट मार्गावरून थेट पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडणारे उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या पुलाच्या बांधकामासाठी महापालिकेच्यावतीने निविदा मागवण्यात आली असून ही निविदा अंतिम होऊन कंत्राटदाराची निवड करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर एकप्रकारे मुंबईकरांना माहीम मोरी रोड, मच्छीमार नगर मार्गे कॉजवे वरून करावा लागणारा कंटाळवाणा प्रवास तीन सिग्नल टाळत सुलभ करता येणार आहे.

माहीम परिसर हा शहराचा शेवटचा भाग असून शहरातून पश्चिम उपनगरात जायचे असल्यास वीर सावरकर मार्ग किंवा लेडी जमशेटजी मार्ग या रस्त्यावरून प्रवास करून सरळ जाता येते. किंवा या मार्गे वांद्र्यातून शहरात येता येते. परंतु उपनगरात जाण्यासाठी किंवा उपनगरातून येण्यासाठी माहीम मच्छीमार नगर किंवा माहीम बस डेपो शेजारील मोरी रोड मार्गाचा वापर करता येतो. परंतू या मोरी रोड वरून प्रवास करत माहीम कॉजवे मार्गे वांद्र्याला पल्ला गाठताना तीन सिग्नल पार करावी लागतात. त्यामुळे कधी कधी अर्धा अर्धा तास याच प्रवासाला जात असतो. परिणामी या वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास आजवर वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. परिणामी याचा फटका जनतेला सहन करावा लागत आहे.

(हेही वाचा – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘दगडूशेठ’ गणपती चरणी लीन)

त्यामुळे या कायमच्या वाहतूक कोंडीवर उपाय पश्चिम द्रुतगती महामार्गवर पोहोचता यावे म्हणून माहीम सेनापती बापट मार्गावरून मच्छीमार नगर मधून सहज वांद्रे पश्चिम द्रुतगती महामार्ग जोडणारे पूल बांधण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. मिठी नदी आणि माहीम खाडी जोडणाऱ्या या खाडीवरून सुमारे ४०० मीटर लांबीचा पूल उभारण्यात येणार आहे. यासाठी कंत्राटदार निवड करण्यासाठी निविदा मागवण्यात आली. या पुलाच्या बांधकामासाठी सुमारे २२० कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.