देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना आज म्हणजेच मंगळवार १ ऑगस्ट रोजी पुण्यात ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. दिपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. लोकमान्य टिळक स्मारक ट्र्स्टच्यावतीनं लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचे स्वरूप पुणेरी पगडी, सन्मानपत्र, १ लाख रूपये रोख असे होते. या पुरस्काराची रक्कम नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नमामि गंगे प्रकल्पाला देणार असल्याचे जाहीर केले आहे. यावेळी त्यांनी लोकमान्य टिळक हे भारतीयांच्या कपाळावरील टिळा असल्याचे अभिमानाने सांगितले.
नेमकं काय म्हणाले पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठी भाषेतून करत आजचा पुरस्कार हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण असल्याचे सांगितले. तसेच पुढे बोलतांना मोदी म्हणाले की; “आजचा दिवस माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा. या पुरस्काराचा निधी मी ‘नमामि गंगे’ प्रकल्पाला देणार आहे. या पुरस्कारानंतर माझी जबाबदारी वाढली आहे. तसेच महात्मा गांधींनी टिळकांना आधुनिक भारताचा निर्माता म्हटले. टिळकांनी शिवजयंतीचे आयोजन सुरू केल्याचा उल्लेखही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
Speaking at the Lokmanya Tilak National Award Ceremony in Pune. https://t.co/DOk5yilFkg
— Narendra Modi (@narendramodi) August 1, 2023
(हेही वाचा – महायुतीचे सर्व पक्ष एकमेकांचा प्रचार करतील – चंद्रशेखर बावनकुळे)
पुरस्कार घेतांना पंतप्रधान मोदी भावुक
हा पुरस्कार घेतांना मी उत्साही आणि भावुक झाल्याचे मोदींनी (Narendra Modi) सांगितले. पुढे मोदी म्हणाले की, आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी. सोबत अण्णा भाऊ साठे यांची जयंती. लोकमान्य टिळक स्वातंत्र्याच्या इतिहासाच्या कपाळावरचा टिळा आहेत. सोबत अण्णा भाऊ यांनी समाजसुधारणेसाठी दिलेले योगदान असाधारण आहे. मी दोघांनाही श्रद्धापूर्वक नमस्कार करतो.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community