देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज म्हणजेच मंगळवार १ ऑगस्ट रोजी पुण्यात ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. या सन्मानावेळी शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर आले होते. यावेळी शरद पवार यांनी त्यांच्या भाषणातून पंतप्रधानांचे कौतुक केले. त्यामुळे राजकीय वर्तुळातून चर्चा सुरु झाली आहे.
(हेही वाचा – Narendra Modi : लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचा निधी नमामि गंगे प्रकल्पाला देणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी)
गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील राजकीय घडामोडींनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकत्र एकाच मंचावर आले. त्यामुळे शरद पवार नेमकं आपल्या भाषणातून काय विधान करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र शरद पवार यांनी आपल्या भाषणातून मोदींचे कौतुक केले आहे.
काय म्हणाले शरद पवार?
टिळक पुरस्काराला आगळं वेगळं महत्त्व आहे. आज आपण आणि टिळक स्मारकाने पुरस्कारासाठी मोदीजींची निवड केली. या आधी देण्यात आलेल्या पुरस्कारांमध्ये इंदिरा गांधी, खान अब्दुल गफार खान, बाळासाहेब देवरस, शंकर दयाळ शर्मा, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंह यांचा समावेश होता, अशी अनेक मान्यवरांची नावं या ठिकाणी घेतली जातील. या मान्यवरांच्या पंक्तीत नरेंद्र मोदींचा समावेश झाला याचा सर्वांना आनंद झाला. म्हणून आमच्या सगळ्यांची वतीने त्यांची निवड झाली, त्यांना हा पुरस्कार देण्यात येतोय, त्यांचं अंत:करणापासून अभिनंदन करतो.
सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख आज होतोय पण यापूर्वीच या पुण्यातचं सर्जिकल स्ट्राईक झाला होता. हा सर्जिकल स्ट्राईक छत्रपती शिवाजी महाराजांकडून लाल महालात झाला. तसेच या देशाच्या जवानांनी देशाचं रक्षण करण्यासाठी एक प्रकारचं सर्जिकल स्ट्राईक केला होता. सर्जिकल स्ट्राईकची चर्चा आता होते. पण लाल महालात शाईस्तेखानानं ताबा घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर या देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक पुण्यात झाला ही गोष्ट विसरता येणार नाही,” अशा शब्दांत पवारांनी आपली भूमिका मांडली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community