Ajit Pawar : साहेब आणि दादा पूर्वीही वेगळे नव्हतो आणि आताही नाही; अजित पवारांच्या विधानाने राजकीय चर्चेला उधाण

122

पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार एका मंचावर आले, त्याआधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक सूचक विधान केले. साहेब आणि दादा पूर्वीही वेगळे नव्हते व आजही वेगळे नाहीत. त्यामुळे तुम्ही कोणतीही काळजी करू नका, असे अजित पवार म्हणाले. त्यांच्या या विधानावरून राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे.

तरुणांना संधी देणार

अजित पवार यांनी शिरुरमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातील अनुभव सांगत शरद पवार व आपण एकच असल्याचा दावा केला आहे. ते भाजपचे माजी आमदार दिवंगत बाबुराव पाचार्णे यांच्या स्मारकाच्या उद्घाटनावेळी बोलत होते. वडिलधाऱ्यांचे मार्गदर्शन व आशीर्वादाने तरुणांनी राजकारण व समाजकारणात येण्याची गरज आहे. त्यांनी शिकले पाहिजे. राजकारणात पूर्वीपासूनच तरुणांचे एक वेगळे आकर्षण आहे. त्यामुळे तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सक्रिय राजकारणात उतरले पाहिजे, असे अजित पवार म्हणाले. त्यांच्या या विधानातून त्यांनी आपल्या पक्षात भविष्यात तरुणांना मोठी संधी असल्याचे संकेत दिले.

(हेही वाचा PM Narendra Modi : लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी पंतप्रधानांचीच निवड का? दीपक टिळक म्हणाले…)

शरद पवारांनी लवकर उठण्याची सवय लावली

यावेळी त्यांना तुम्ही सकाळी लवकरच कामाला सुरूवात करता, असा प्रश्न केला असता अजित पवारांनी हे शरद पवारांमुळे शक्य झाल्याचे स्पष्ट केले. मला शरद पवार यांनी सकाळी लवकर उठून कामाला लागण्याची सवय लावली. म्हणूनच मी सकाळी 7 वा. कामाला सुरुवात करत असतो. शरद पवार व मी काही वेगळे नाही. आम्ही कालही एकत्र होतो व आजही एकत्रच आहोत, असे ते म्हणाले. अजित पवार यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात शरद व अजित पवारांच्या संबंधांविषयी खमंग चर्चा रंगली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादीची 2 शकले पडली आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या मातब्बर नेत्यांचा एक गट शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सामील झाला आहे. यामुळे शरद पवार एकाकी पडल्याचे चित्र आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.