बनावट औषधांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतानाच सरकारने त्याला आळा घालण्यासाठी देशातील ३०० फार्मा ब्रँडसाठी क्युआर कोड किंवा बारकोड ठेवणे अनिवार्य केले आहे. आता १ ऑगस्टला किंवा त्यानंतर बनवलेल्या औषधांसाठी हा नियम बंधनकारक असणार आहे.
ज्या औषधांवर क्यूआर कोड अनिवार्य करण्यात आले आहेत, त्यामध्ये कॅल्पोल, डोलो, सॅरिडॉन, कॉम्बीफ्लम आणि अँटीबायोटिक्स अजिथ्रल, ऑगमेंटिन, सेफ्टम, मेफ्टेल ते ऍलर्जी-विरोधी औषधं अॅलेग्रा आणि थायरॉईड औषध आणि थायरोनॉर्म या औषधांचा समावेश असणार आहे. क्युआर कोडमुळे औषधांचे ट्रेसिंग आणि ट्रॅकिंग करणे सोपे होईल. या निर्णयामुळे देशातील निकृष्ट किंवा बनावट औषधांच्या विक्रीला आळा घालण्यास मदत होईल, असे औषध उद्योगातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
(हेही वाचा PM Narendra Modi : लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी पंतप्रधानांचीच निवड का? दीपक टिळक म्हणाले…)
क्युआर कोडमध्ये कोणती माहिती असेल?
क्युआर कोडचा संग्रहित डेटा किंवा माहितीमध्ये उत्पादनाची ओळख कोड, औषधाचे योग्य आणि जेनेरिक नाव, ब्रँड नाव, उत्पादकाचे नाव आणि पत्ता, बॅच नंबर, उत्पादनाची तारीख आणि उत्पादन परवाना क्रमांक यांचा समावेश असणार आहे. औषधांचे फॉर्म्युलेशन ब्रँड तयार करण्यासाठी या सर्व ३०० देशी आणि विदेशी कंपन्यांना त्यांच्या औषधांवर क्युआर कोड टाकणे अनिवार्य करण्यात आले आहे. जर, एखाद्या कंपनीला हवे असल्यास ती स्वतःच कोणत्याही ब्रँडसाठी बार कोड किंवा क्युआर कोड लागू करू शकते किंवा प्रिंटही करू शकते.
Join Our WhatsApp Community