वाढदिवशी केक कापण्याची प्रथा आहे, त्यावेळी केकवर मेणबत्ती पेटवल्या जातात, वाढदिवस असणारी व्यक्ती मेणबत्ती फुंकतो आणि नंतर केक कापतो, ही पद्धत आरोग्यासाठी अत्यंत घातक असल्याचे समोर आले आहे. कारण यामुळे हजारो जीव-जंतू केकवर बसतात. असे एका तज्ज्ञाने म्हटले आहे. अमेरिकेतील क्लेमसन युनिव्हर्सिटीचे फूड सेफ्टी प्रोफेसर पॉल डॉसन यांनी माध्यमांना सांगितले की, त्यांच्या टीमने केलेल्या अभ्यासात सुमारे १४०० टक्के जंतू बाहेर पडत असल्याचे आढळून आले आहे.
प्रोफेसर डॉसन यांच्या म्हणण्यानुसार, तोंडातून निघालेल्या पाण्याच्या थेंबामुळे केकवरील बॅक्टीरिया जास्त वाढतो. प्रोफेसर डॉसन पुढे म्हणाले, माझा सल्ला असा आहे की जर कोणी केकवर मेणबत्त्या विझवत असेल तर, तेव्हा तुम्हाला मिळालेल्या स्लाइसचा वरचा थर काढून, तुम्ही केक खाऊ शकता, तरीही असा केक खाल्ल्याने घाबरून जायची गरज नाही, असेही ते म्हणाले. वाढदिवसाचा केक खाण्यात फारच कमी धोका आहे. खरी चिंता ही रोगप्रतिकारक क्षमता कमी असलेल्या आणि आजारी किंवा वृद्ध लोकांची आहे असे प्रोफेसर डॉसन यांनी सांगितले.
२०१७ मध्ये, कॅनेडियन सेंटर ऑफ सायन्स अँड एज्युकेशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासाने संपूर्ण प्रक्रियेचा तपशीलवार अभ्यास करून अशा जोखमीवर प्रकाश टाकला. केकमध्ये एरोसोल ट्रान्सफरची चाचणी घेण्यासाठी, आयसिंग फॉइलवर केक समान रीतीने पसरवले गेले आणि नंतर मेणबत्त्या फॉइलमधून स्टायरोफोम बेसमध्ये ठेवल्या गेल्या. चाचणी करणाऱ्यांना मेणबत्त्या फुंकून विझवण्यास सांगितले गेले, बॅक्टेरियाच्या दूषिततेची पातळी निश्चित करण्यासाठी. आयसिंगच्या पृष्ठभागावर मेणबत्त्या फुंकल्याने आयसिंगच्या तुलनेत १४०० टक्के अधिक बॅक्टेरिया तयार होतात, असे कॅनेडियन सेंटर ऑफ सायन्स अँड एज्युकेशनमध्ये केलेल्या अभ्यासात आढळून आले.
Join Our WhatsApp Community