जे 60-70 वर्षात झाले नाही ते मागील नऊ वर्षात विकास रूपाने मिळाले आहे. अडीच वर्षात महविकास आघाडीमधून बाहेर पडण्याचा निर्णय आम्ही घेतला नसता तर राज्य 10 ते 15 वर्ष मागे गेले असते, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
लोकमान्य यांच्या कल्पनेतील सामर्थ्यशाली देश बनविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. ही ऐतिहासिक नगरी असून या भूमीत आज वेगवेगळ्या विकासकामाचे लोकार्पण होत आहे. त्याचा दिलासा लाखो नागरिकांना मिळेल. मागील नऊ महिन्यात मोदी चार वेळा राज्यात आले आणि त्यांनी विविध विकासकामांचे उद्घाटन केले, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. पंतप्रधान मोदी आले की आपल्याला ऊर्जा, ताकद मिळते. केंद्र सरकारने पाठबळ दिल्याने आपले सरकार वेगाने वाटचाल करत आहे. तिसरे इंजिन आपल्याला अजित पवार यांनी जोडले आहे. मोदी हे देशातील सर्वसामान्य व्यक्तींना मदत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांची दखल जगभरातील नेते घेत असून अयोध्येतील राम मंदिर,जम्मू काश्मीर मध्ये कलम 370 हटविण्याचे काम त्यांनी केले आहे. अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन करण्याच्या स्वप्न पूर्ततेच्या देशाने वाटचाल होत आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
Join Our WhatsApp Community