राज्यातील कृषी सेवकांच्या मानधनात १० हजार रुपयांची वाढ करण्यात आली असून हे वाढीव मानधन १ ऑगस्ट २०२३ पासून लागू होणार आहे. कृषी आणि पशुसंवर्धन विभागाने मंगळवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. या निर्णयामुळे गेली ११ वर्ष अल्प मानधनात काम करणाऱ्या कृषी सेवकांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या महिन्यात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषी सेवकांच्या मानधनात सहा हजार रुपयांवरून १६ हजार रुपये इतकी वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची अमंलबजावणी ऑगस्ट २०२३ पासून होणार आहे. राज्यात २००४ पासून कृषी सेवकांची नेमणूक केली जात आहे. २००४ मध्ये कृषी सेवकांचे मानधन २ हजार ५०० रुपये होते. त्यानंतर २०१२ मध्ये यात वाढ करून मानधन सहा हजार रुपये करण्यात आले होते. आता या मानधनात १० हजार रुपयांची वाढ झाली आहे.
Join Our WhatsApp Community