हल्ली बार्बी डॉलच्या चित्रपटाची फार चर्चा सुरू आहे. गेल्या साठ दशकांपासून क्वचितच कोणी मुलगी असेल जिच्या बालपणी ती बार्बी डॉलशी खेळली नसेल. बार्बी डॉल ही स्वतंत्र अस्तित्व असलेली मुलींची आयडॉल म्हणून मार्केटमध्ये आली.
अमेरिकेत राहणारी रूथ हँडलर नावाच्या स्त्रीने बार्बी डॉल बनवली. तिने बनवलेल्या बाहुलीचे नाव आपली मुलगी बार्बराच्या नावावरून बार्बी असे ठेवले होते. 1960 च्या दशकात बार्बी डॉल ही जगातील सर्वात जास्त विक्री होणारी बाहुली ठरली. बार्बी डॉल ही मुलींसाठी स्वतंत्र आणि स्वावलंबी आदर्श ठरली. वेगवेगळ्या रूपातील बार्बी डॉलमुळे मुलींना स्वावलंबी होण्याची प्रेरणा मिळायला लागली. मार्केटमध्ये बार्बी डॉल्स टीचर, नर्स, पोलीस, मॉडेल, गृहिणी, डॉक्टर, सेक्रेटरी, पायलट, अंतराळवीरांगांना, व्हीलचेअरवर बसलेली, किमोथेरपी घेणारी एवढेच नव्हे तर डाऊन सिंड्रोम असलेली बार्बी त्या त्या कॅरेक्टरनुसार वेगवेगळ्या शेप, साईज आणि रंगांमध्ये उपलब्ध आहेत.
(हेही वाचा Udhhav Thackeray : उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणुका कधीही लागू शकतात तयारीला लागा)
बार्बी डॉलला वेगवेगळ्या रुपात तयार करण्याची सुरुवात साठच्या दशकात सुरू झाली. त्यावेळी अमेरिकेत रंगभेदावरून गदारोळ माजला होता. ज्या वर्षी मार्टिन ल्यूथर किंगची हत्या करण्यात आली त्याच वर्षी काळ्या रंगाची बार्बी डॉल मार्केटमध्ये आणण्यात आली. तिचे नाव क्रिस्टी असे ठेवण्यात आले. पण 80 च्या दशकापर्यंत या काळ्या बाहुलीला बार्बी म्हणण्याची अनुमती देण्यात आली नाही. पण त्यानंतर ही काळी बाहुली अमेरिकेत राहणाऱ्या आफ्रिकन महिलांची आयकॉन बनली. या काळ्या बाहुलीमुळे आफ्रिकेतील महिलाही स्वतंत्र, सुंदर आणि ग्लॅमरस असू शकतात असा संदेश जाऊ लागला.
Join Our WhatsApp Community