भारत आणि वेस्ट इंडिज या संघांमध्ये झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने दमदार विजय मिळवत इतिहास रचला आहे. चार अर्धशतकांच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजसमोर ३५१ धावांचा डोंगर रचत तब्बल १४ वर्षांचा विक्रम मोडीस काढत क्रिकेट विश्वात एक नवी ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
यापूर्वी किंग्सटन येथे २६ जून २००९ या दिवशी भारताने विंडीज संघाविरुद्ध खेळताना ६ बाद ३३९ अशी धावसंख्या उभारली होती. त्यानंतर गेल्या १४ वर्षांत हा विक्रम अबाधित होता. पण, या १४ वर्षांनंतर आता भारतीय संघाने वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात सर्वाधिक ३५१ धावा करुन विजय मिळवत सर्व भारतीयांचा आनंद द्विगुणीत केला होता.
(हेही वाचा – राज्यामध्ये खरीप पेरणी ‘इतक्या’ टक्क्यांनी कमी; गहू, कडधान्ये, तेलासह डाळीही महागणार)
भारताच्या संघावर विंडीज संघाने २००६ साली शेवटचा मालिका विजय साकारला होता. त्यानंतर त्यांच्यासाठी या सामन्यात सुवर्णसंधी चालून आली होती. पण वेस्ट इंडिजचे ते स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community