चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जत येथील एनडी स्टुडीओमध्ये गळफास घेत आत्महत्या केली आहे. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. ते ५८ वर्षांचे होते. देसाईंच्या आत्महत्येच्या बातमीने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टी हादरली असून अनेक कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे. नितीन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबतच निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेतेदेखील होते.
नितीन देसाईंच्या आत्महत्येमागील कारण अस्पष्ट
नितीन देसाईंनी त्यांच्या एनडी स्टुडीओत गळफास घेत आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले. स्टुडीओतील कर्मचाऱ्यांना आत्महत्या केल्याचे समजताच त्यांनी लगेचच स्थानिक पोलिसांना या संदर्भात माहिती दिली. पोलीस आता पुढील तपास करत आहेत. नितीन देसाई यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
(हेही वाचा – घाटकोपर बेस्ट डेपोतील कंत्राटी कर्मचारी अचानक संपावर, नोकरदार मुंबईकरांचे हाल)
नितीन देसाई यांनी अनेक सुपरहिट हिंदी सिनेमांचे सेट उभारले होते. ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘माचिस’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘जोधा अकबर’ या सुपरहिट सिनेमाचे कला दिग्दर्शन त्यांनी केले होते. त्यांना चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळाला होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community