आज विधानपरिषदेत काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागातील बदल्या आणि उत्पादन शुल्क विभागात होणारा भ्रष्टाचार याबाबत लक्षवेधी उपस्थित केली होती. या चर्चेत भाग घेत भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी ज्या लोकांकडे अधिकृत लायसन्स आणि परवानग्या आहेत त्यांना विनाकारण त्रास देत नडणाऱ्या लाड आणि तापडे या दोन निरीक्षकांची चौकशी करुन त्यांना तात्काळ निलंबित करा, अशी मागणी केली.
यावेळी दरेकर म्हणाले की, ही लक्षवेधी अत्यंत महत्वाची आहे. कारण हे निरीक्षक आहेत ते स्वतःला काय समजतात माहित नाही. तापडे नावाचा एक आणि लाड नावाचा एक निरीक्षक आहे. मी स्वतः त्यांच्याशी अनेकदा बोललो. मंत्री, आम्ही सांगतोय, बोलतोय तरी एवढी कुठली ताकद येते, एवढी पैशाची कुठली मस्ती त्यांना येते. हे सर्व निरीक्षक आहेत त्यांची अँटी करप्शन चौकशी लावली पाहिजे. ते कुणालाच जुमानत नाहीत.
(हेही वाचा – Veer Savarkar : ‘शिदोरी’वरील कारवाईची भूमिका स्वागतार्ह; राहुल गांधींवर दखलपात्र गुन्हा दाखल करा – रणजित सावरकर यांची मागणी)
ज्यांच्याकडे अधिकृत लायसन्स, परवानग्या असतील त्यांना कशासाठी नडता. त्यामुळे या दोन निरीक्षकांची चौकशी करा त्यात तथ्य आढळले तर त्यांना तात्काळ निलंबित करा, अशी मागणी दरेकर यांनी केली. यावर मंत्री शंभूराजे देसाई यांनी दरेकर यांच्याकडे त्या अधिकाऱ्याबाबत काही तक्रारी असतील तर त्या माझ्याकडे द्याव्यात. त्या सर्व तक्रारींची निश्चितपणाने चौकशी केली जाईल, असे सकारात्मक उत्तर दिले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community