Pakistan : पाकिस्तान दिवाळखोरीत; पेट्रोल 272.95 रुपये तर डिझेल 273.40 रुपये प्रति लिटर

148

पाकिस्तानमध्ये मंगळवारी डिझेल आणि पेट्रोलच्या दरात सुमारे 20 रुपयांनी वाढ करण्यात आली. अर्थमंत्री इशाक दार यांनी ही घोषणा केली. दार यांच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMFच्या अटी पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या महिन्यात आयएमएफने पाकिस्तानला डिफॉल्टपासून वाचवण्यासाठी सुमारे 3 अब्ज डॉलरचे कर्ज दिले.

नवीन दरांबद्दल बोलायचे झाले तर, पेट्रोल 272.95 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 273.40 रुपये प्रति लीटर दराने उपलब्ध होईल. पाकिस्तानचा एक रुपया भारताच्या 3.50 रुपयांच्या जवळपास आहे. तात्पर्य, भारताचा रुपया पाकिस्तानच्या रुपयापेक्षा अडीचपट मजबूत आहे.

देशासाठी आवश्यक निर्णय

पाकिस्तानच्या वृत्त वाहिनीशी बोलताना अर्थमंत्री दार म्हणाले, देशात आधीच महागाई खूप आहे हे खरे आहे, पण आम्ही पेट्रोल आणि डिझेल महाग करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो पाकिस्तानच्या भल्यासाठी आहे. येत्या काही दिवसात परिस्थिती खूप वेगाने सुधारेल. नवीन दरही लागू करण्यात आले आहेत. एका प्रश्नाच्या उत्तरात दार म्हणाले- जर तुम्ही आंतरराष्ट्रीय बाजारावर नजर टाकली तर 15 दिवसांत कच्चे तेल खूप महाग झाले आहे. पाकिस्तानला या गोष्टी आयात कराव्या लागतात, म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. दर वाढवण्याचा निर्णय घेण्यापूर्वी मी माझ्या टीमशी रात्रभर चर्चा केली. शेवटी असे वाटले की दुसरा मार्ग नाही. आमचा प्रयत्न असा होता की हा बोजा जनतेवर टाकू नये, पण चांगल्या भविष्यासाठी कधी कधी कटू निर्णय घ्यावे लागतात. याबाबत आम्ही पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशीही चर्चा केली होती.

(हेही वाचा Veer Savarkar : ‘शिदोरी’वरील कारवाईची भूमिका स्वागतार्ह; राहुल गांधींवर दखलपात्र गुन्हा दाखल करा – रणजित सावरकर यांची मागणी)

जेव्हा दार यांना विचारण्यात आले की पेट्रोल आणि डिझेल महाग करण्यासाठी आयएमएफचा दबाव आहे का? यावर दार म्हणाले, सर्वांना माहित आहे की आपण जगाला आणि विशेषत: आयएमएफला दिलेली आश्वासने पूर्ण करायची आहेत. असे झाले नाही तर भविष्यात कोण मदत करेल. पेट्रोल आणि डिझेलवर कोणतीही सबसिडी दिली जाऊ शकत नाही. देशातील जनतेला थोडा दिलासा मिळावा यासाठी आम्ही काही गोष्टींचा विचार करत आहोत. याबाबत पंतप्रधान लवकरच माहिती देणार आहेत. आमचा आयएमएफशी स्टँडबाय करार आहे हे देशाने विसरू नये. त्यांच्या अटींची पूर्तता न केल्यास अडचणी वाढू शकतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.