Congress : काँग्रेसचा नामनिर्वाचित विरोधी पक्षनेता ‘एकांडा शिलेदार’

149

बहुचर्चेनंतर आणि बहुप्रतिक्षेनंतर अखेर काँग्रेसच्या हायकमांडने राज्याच्या विधानसभेत विरोधी पक्षनेता नेमला. काँग्रेसमधून अनेक नेत्यांची नावे या पदासाठी चर्चेत होती, पण विजय वडेट्टीवार यांच्या गळ्यात विरोधी पक्षनेते पदाची माळ पडली आहे. मात्र विरोधी पक्षांतील किती आमदारांचा याला पाठिंबा आहे, हा प्रश्न निर्माण होणारा प्रसंग बुधवारी, २ ऑगस्ट रोजी विधान भवनात घडला. माध्यमांसमोर नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार माध्यमांसमोर बोलायला आले, तेव्हा त्यांच्या मागे एकही आमदार दिसला नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगल्यानंतर महाविकास आघाडीत सर्वात मोठा पक्ष ठरल्याने विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची वर्णी लागली आहे. गेले कित्येक दिवस विरोधीपक्षनेते पदाच घोंघड भिजत पडल होत. दिल्लीश्वरांच्या आदेशानंतर काँग्रेसने मंगळवारी आपल्या विरोधी पक्षनेते पदासाठी विजय वडेट्टीवार यांचे नाव घोषित केले. चार दिवसांच्या अवकाशांनतर बुधवारी, २ ऑगस्ट रोजी सकाळी विधानसभेचे कामकाज सुरू झाले. विधानसभेची विशेष बैठक सुरू होण्याआधी नामनिर्वाचित विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे विधानभवनात आगमन झाले. माध्यमांनी त्यांना विविध प्रश्नांवर प्रतिक्रिया मागितल्या. त्याकरिता ते माध्यमांच्या स्टँड जवळ आले मात्र नामनिर्वाचित विरोधी पक्षनेत्याच्या पाठीमागे साधा एकही आमदार दिसून आला नाही. त्यामुळेच किती ते पारदर्शक आहेत हे दिसून आले? की हायकमांडने डोक्यावर लादला ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याच पदासाठी काँग्रेसचे संग्राम थोपटे यांनी मोठी लॉबिंग केली होती आणि जवळपास २८ आमदारांचे समर्थन देखील मिळवले होते. सर्वसाधारण जेव्हा जेव्हा विरोधी पक्षनेते माध्यमांसमोर येतात तेव्हा त्यांच्यामागे विरोधी पक्षाचे आमदार असतात. परंतु आज असे चित्र दिसले नाही. त्यामुळे काँग्रेस विधिमंडळात सार्वकाही आलबेल नसल्याचे दिसून येते.

(हेही वाचा Veer Savarkar : ‘शिदोरी’वरील कारवाईची भूमिका स्वागतार्ह; राहुल गांधींवर दखलपात्र गुन्हा दाखल करा – रणजित सावरकर यांची मागणी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.