Depression : वाढत्या कामाचा ताण ठरतेय मानसिक आजारांचे कारण

128

दोन दिवसांपूर्वी केईएम रुग्णालयात निवासी डॉक्टराची आत्महत्या, जयपूर- मुंबई ट्रेनमध्ये रेल्वे पोलिसाने केलेला अंधाधुंद गोळीबार या दोन्ही घटना ताज्या असतानाच बुधवारी प्रसिद्ध कलादिगदर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली. दोनशे कोटींपेक्षाही जास्त कर्ज वेळेवर फेडता न आल्याने सरदेसाई यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. कामाच्या दैनंदिन ताणातून स्वतःला वेळ काढता येत नसल्यास किंवा ताण असह्य होत असल्यास मनसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्या, असे कळकळीचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ताण, वाढलेले कर्ज, घरसंसारातील वाढत्या मागण्या यात कित्येकदा माणसाला मानसिक ताण असह्य होतो. या ताणावर मात करण्यासाठी रोजच्या जीवनात थोडा वेळ काढा, साथीदार किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीशी अडचणींबाबत बोला, आर्थिक समस्या असल्यास तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शन घ्या, असे आवाहन मनसोपचारतज्ज्ञ करत आहेत.

(हेही वाचा Nitin Gadkari : नितीन गडकरींनी मुंबई – गोवा महामार्गाप्रकरणी व्यक्त केला खेद; म्हणाले, पुस्तक लिहिता येईल…)

व्यावसायिक पातळीवर मानसिक आजारावर उपाय म्हणून आता खासगी कार्यालयात ह्युमन रिसॉर्स पातळीवरही आता काम सुरु झाले आहे. एका खासगी मल्टीमीडिया कंपनीकडून कर्मचाऱ्यांच्या मानसिक तणावाची माहिती घेण्यासाठी दर तीन महिन्यांनी मनसोपचारतज्ज्ञांकडून तपासणी केली जाते, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

औषधासह उपचार!

बरेचदा मानसिक ताण इतका खोलवर असतो की रुग्णाला औषधं दिली जातात. काही औषधांच्या सेवनाने रुग्णाला गुंगी राहते. मानसिक ताण कमी राहण्यासाठी रुग्णाला पुरेशी झोप महत्वाची ठरते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.