Agarbatti gang : ‘अगरबत्ती गँग’ला अजमेर दर्ग्यातून अटक

139

साधूंच्या वेशात येवून आपले सावज हेरणाऱ्या ‘अगरबत्ती गँग’ला च्या दोन सदस्यांना अजमेर दर्गा जवळून मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. ही टोळी दक्षिण मुंबईतील काळबादेवी, मुंबादेवी परिसरातील व्यापाऱ्यांना लक्ष करून त्यांना लुटण्याचे काम करीत होती. लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी या दोघांना नुकतीच अटक करण्यात आली आहे.

अल्ताफ फकीर मोहम्मद हुसेन (४०) आणि जाबीर अली तालीब हुसेन (३८) असे अटक करण्यात आलेल्या अगरबत्ती गँग’च्या सदस्यांची  नावे असून ही टोळी मूळची मध्य प्रदेश राज्यातील आहे. या टोळीचे सदस्य जोडीने मुंबईतील व्यापारी संकुल, बाजारपेठामध्ये फिरून आपले सावज हेरत असतात, एक जण साधूंच्या वेशात हिंदू व्यापाऱ्यांना गाठून  “मै आयोध्या नगर से आया हु, मैने आपको रोक के कोई परेशान तो नही किया ना” असे बोलून व्यापाऱ्याकडे एक रुपयाचे नाणे मागून हातातील अगरबत्तीने एक रुपयाला ओवाळून तो रुपया व्यापाऱ्याला परत दिला जात, त्यानंतर त्याचा दुसरा साथीदार येवुन, ये लोक भरोसे के लायक नही है, ये सच मे अयोध्या नगर से हैं, तो जरूर ब्राम्हण होगे अगर ये सच मे ब्राम्हण हैं। तो ये हमारे मन कि बात भी बोल सकते है, तो मै अपने मन मे एक भगवान का नाम लेता हु आप भी एक भगवान का नाम लो” असे व्यापाऱ्यास बोलण्यात गुंतवून ठेवत आणि संधी मिळताच दुसरा व्यापाऱ्या जवळ असणारी बॅग, मौल्यवान वस्तू काढून लंपास होत.

(हेही वाचा Congress : काँग्रेसचा नामनिर्वाचित विरोधी पक्षनेता ‘एकांडा शिलेदार’)

असाच काहीसा प्रकार अंधेरीतील एका २२ वर्षीय सोनं कारागीर सोबत घडला, सोनं कारागिर दागिने घडविण्यासाठी सोनं घेऊन काळबादेवी येथे आले असता या दोघांनी कारागीरला वाटेत गाठले व त्याच्याकडून एक रुपया घेऊन अगरबत्ती ने ओवाळून काही क्षणात कारागीर जवळील दागिन्यांची बॅग घेऊन रफूचक्कर झाले. या प्रकरणी लो.टी.मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वाघ यांनी या टोळीच्या मागावर एक पथक पाठवले, या टोळीच माग काढण्यात आला असता अगरबत्ती गँग चे काही सदस्य अजमेर दर्गा येथे मोहरम साजरा करण्यासाठी गेले अशी माहिती मिळाली. पोलीस पथक अजमेरला रवाना होऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने या दोघांना ताब्यात घेऊन मुंबईत आणून दोघांना अटक करण्यात आली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.