Burkha : मुंबईतील महाविद्यालयातही मुसलमान विद्यार्थिनींचा बुरख्यासाठी धिंगाणा

226

ज्या प्रकारे कर्नाटकात शाळा-महाविद्यालयांत मुसलमान विद्यार्थिनींनी त्यांना गणवेशाच्या शिवाय हिजाब, बुरखा घालण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करत आकांड तांडव केला. आता हेच लोन महाराष्ट्राच्या मुंबईपर्यंत पसरले आहे. चेंबूरच्या आचार्य कॉलेजमध्ये बुरखा घातलेल्या विद्यार्थिनींनी गोंधळ घातला. कॉलेजच्या सुरक्षा रक्षकांनी या विद्यार्थिनींना कॉलेजमध्ये प्रवेश करण्यापूर्वी गणवेशात या आणि मास्क काढा, असे म्हटले. मात्र, त्यानंतर या बुरखाधारी विद्यार्थिनींनी गोंधळ घातला आणि गेटवरच हाणामारी सुरू केली.

आचार्य महाविद्यालय, चेंबूर हे पूर्व उपनगरातील एक प्रसिद्ध आणि खूप जुने महाविद्यालय आहे. एवढ्या वर्ष जुन्या कॉलेजमध्ये जातीभेदाची एकही घटना समोर आलेली नाही. पण, मंगळवारी अकरा वाजता आचार्य महाविद्यालयात गोंधळ सुरू झाला. हा गोंधळ बुरखा घातलेल्या विद्यार्थिनी आणि त्यांच्या समर्थकांनी केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी बुरखा घातलेल्या विद्यार्थिनींना कॉलेजमध्ये प्रवेश करायचा होता, तेव्हा प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना मास्क काढण्यास सांगितले.

(हेही वाचा Loksabha : मणिपूरच्या मुद्यावरून लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब)

मला गणवेशाचे वाईट वाटले!

आचार्य महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी गणवेश आहे. पण, बुधवारी सकाळी आलेल्या विद्यार्थिनी बुरखे घालून आल्या होत्या. त्यावर सुरक्षा रक्षकाने बुरखा काढल्यानंतरच कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल, असे सांगितले. मात्र, विद्यार्थिनी कॉलेजमध्ये बुरखा न काढण्यावर ठाम होत्या. त्यानंतर त्यांना प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे ता विद्यार्थीनींनी गेटवर गोंधळ घातला.

कर्नाटकप्रमाणे मुंबईतही नाटक

2022 मध्ये कर्नाटकात हिजाबचा मुद्दा उपस्थित झाला होता. इस्लामिक संघटनांनी याबाबत एवढा गदारोळ माजवला की, देश-विदेशात सर्वत्र इस्लामविरोधी म्हणून आवाज उठवला गेला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, मात्र, तत्कालीन राज्य सरकारने महाविद्यालयाच्या निर्णयाचे समर्थन केले, तर इस्लाम धर्मीयांचे समर्थन असलेल्या विद्यमान सरकारने कर्नाटक सरकारचा निर्णय मागे घेतला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.