Bangladeshi : मुंबईत बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी

128

नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक घुसखोरी करून बेकायदेशीरित्या वास्तव्य करीत आहे. दहशतवाद विरोधी पथकाने बुधवारी मुंबई आणि नवी मुंबईतून दोन महिलांसह ९ जणांना विविध ठिकाणांहून अटक करण्यात आली आहे. हे घुसखोर बांगलादेशी बोगस नावे धारण करून विविध शहरात राहण्यास होते.

दिनसलम शेख उर्फ दिनइस्लाम इकबाल शेख (३५), साबु शहादत मीर उर्फ साबु सुरभ मीर (३६) माजरा रसुल खान (३२), सौम्या संतोष नाईक उर्फ सुलताना शब्बीर खान उर्फ सुलताना संतोष नायर उर्फ टिना (२१), सलमान अश्रफ अली शेख उर्फ आलमगीर राजू शेख (२१), सलिम तय्यब अली ब्यापारी उर्फ सलीम खलिल मुल्ला (३४), वसिम रबीउल मोरोल (२६),आणि दोन बांग्लादेशी नागरिकांना ना.म. जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतून असे एकूण ९ जणांना अटक करण्यात आली आहे. दिनसलम, साबू आणि माजरा खानला यांना नवीमुंबई नेरुळ येथून तर इतर ६ जणांना मुंबईतील भायखळा आणि ना.म. जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अटक करण्यात आली आहे.

(हेही वाचा Burkha : मुंबईतील महाविद्यालयातही मुसलमान विद्यार्थिनींचा बुरख्यासाठी धिंगाणा)

अटक करण्यात आलेले बांगलादेशी घुसखोर हे मागील काही वर्षांपासून मुंबई आणि नवी मुंबईत बोगस कागदपत्रे आणि बोगस नावाने घुसखोरी करून राहत होते. दहशतवाद विरोधी पथकाच्या काळाचौकी युनिटने अटक करून संबंधित पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या घुसखोर बांग्लादेशी नागरिका विरुद्ध कलम ३ (अ), ६ पारपत्र अधिनियम १९५० सह कलम ३ (१) परिकीय नागरीक आदेश १९४८, सह १४ विदेशी व्यक्ती अधिनयम १९४६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.