ऑनलाइन गेमिंग, कॅसिनो आणि हॉर्स रायडिंग यांसारख्या खेळांवर २८ टक्के जीएसटी (GST) लागू करण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी कौन्सिलच्या (GST Council) ५१ व्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
जीएसटी कौन्सिलच्या ५१व्या बैठकीनंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेत अर्थमंत्र्यांनी बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. ऑनलाइन गेमिंगवर २८ टक्के जीएसटी १ ऑक्टोबरपासून लागू होण्याची शक्यता आहे. अंमलबजावणीच्या ६ महिन्यांनंतर त्याचा आढावा घेतला जाईल, असेही अर्थमंत्र्यांनी सांगितले. याचबरोबर, पत्रकार परिषदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, ३ वर्षांच्या दीर्घ चर्चेनंतर २८ टक्के कर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जीएसटी कौन्सिलने ऑनलाइन गेमिंगवर कर लावण्यासाठी आवश्यक असलेल्या दुरुस्त्यांच्या प्रस्तावावर चर्चा केली. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत दिल्ली, गोवा आणि सिक्कीमने ऑनलाइन गेमिंगवर २८ टक्के जीएसटीच्या निर्णयाचा आढावा घेण्याची मागणी केली. तसेच, महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि बिहारसह इतर राज्ये २८ टक्के कराच्या बाजूने आहेत आणि ते लवकरात लवकर लागू करायचे आहे, असेही निर्मला सीतारामन म्हणाल्या.
(हेही वाचा Burkha : मुंबईतील महाविद्यालयातही मुसलमान विद्यार्थिनींचा बुरख्यासाठी धिंगाणा)
Join Our WhatsApp Community