Rare Loggerhead Turtle : मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर पुन्हा दुर्मिळ कासवाचे दर्शन

मरीन रिस्पॉडंट ग्रुपने याबाबत वन विभागाच्या कांदळवन कक्षाला माहिती दिली

198
Rare Loggerhead Turtle : मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर पुन्हा दुर्मिळ कासवाचे दर्शन
Rare Loggerhead Turtle : मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर पुन्हा दुर्मिळ कासवाचे दर्शन

मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर दुर्मिळ लॉगरहेड कासव (Rare Loggerhead Turtle) जखमी अवस्थेत रविवारी आढळून आले. रविवारी जुहू चौपाटी (Juhu Chowpatty) येथे स्थानिक मच्छिमारांना दुर्मिळ कासव आढळले. याबद्दल वनविभागाला जखमी समुद्री जीवांच्या बचाव कार्यात मदत करणाऱ्या मरीन रिस्पॉडंट ग्रुपने याबाबत वन विभागाच्या कांदळवन कक्षाला माहिती दिली. मुंबई किनाऱ्यावर लॉगरहेड कासव (Rare Loggerhead Turtle) जखमी अवस्थेत सापडल्याची ही सलग दुसऱ्या वर्षातील दुसरी घटना आहे.

पहिली घटना

याआधी गेल्या वर्षी मालाड येथे पहिल्यांदा लॉगरहेड मादी कासव (Loggerhead female turtle) जखमी अवस्थेत सापडले होते. तिच्या कवचाला तडा जाऊन खोल जखम झाली होती. छातीत पाणी झाल्याने तब्ब्ल दीड महिना न्यूमोनियावर यशस्वी उपचारानंतर तिला पुन्हा समुद्रात वनाधिकाऱ्यांनी सोडले.

(हेही वाचा – Best Strike : सलग दुसऱ्या दिवशी ‘बेस्ट’ विस्कळीत; बेस्टमधील कंत्राटी कामगारांचा संप सुरूच)

दुसरी घटना

रविवारी लॉगरहेड मादी (Loggerhead female turtle) जुहू समुद्रकिनाऱ्यावर सापडली. तिला ऐरोली येथे फ्लेमिंगो अभयारण्यात (Flamingo Sanctuary) समुद्री जीव उपचार केंद्रात वनाधिकाऱ्यांनी आणले. तिच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.