N D Mahanor : जेष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर कालवश

मराठी साहित्यविश्वात ते 'रानकवी' म्हणून प्रसिद्ध आहेत

238
N D Mahanor : जेष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर कालवश

प्रसिद्ध साहित्यिक, निसर्गकवी नामदेव धोंडो महानोर उर्फ ना. धों. महानोर (N D Mahanor) यांचं निधन झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरच्या श्वास घेतला. ना.धों. महानोर यांची ‘पानझड’, ‘तिची कहाणी’, ‘रानातल्या कविता’ गाण्यांमधून पळसखेडची मराठवाडी लोकगीते प्रसिद्ध केली.

(हेही वाचा – Best Strike : सलग दुसऱ्या दिवशी ‘बेस्ट’ विस्कळीत; बेस्टमधील कंत्राटी कामगारांचा संप सुरूच)

त्यांची अनेक गीतं (N D Mahanor) आजही रसिकांच्या मनाचा ठाव घेतात. कवी, गीतकार, शेतकरी, माजी आमदार अशी त्यांची चतुरस्त्र ओळख. बालकवी आणि बहिणाबाईंचा वारसा समृद्ध कऱणारे कवी अशी त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे. असा हा हरहुन्नरी कवी आज आपल्यात नसला तरीही त्यांचे शब्द मात्र कायमच आपल्यासोबत असणार आहेत.

ना. धो. महानोरांचा (N D Mahanor)जन्म महाराष्ट्रातल्या वर्तमान औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण पळसखेड, पिंपळगाव, शेंदुर्णी येथे झाले. त्यानंतर जळगावातील महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. मराठी साहित्यविश्वात ते ‘रानकवी’ म्हणून प्रसिद्ध आहेत.

हेही पहा – 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.