उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची युवासेना आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनाचे अध्यक्ष पद हे दोन्ही नेत्यांनी आपल्या मुलांकडे ठेवले. आदित्य उद्धव ठाकरे हे शिवसेना नेते झाले तरी ते आजही युवा सेना अध्यक्ष आहेत, तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष हे अमित राज ठाकरे हे आहेत. पण दोन्ही सेनेत विद्यार्थ्याचे संघठन बांधण्याची जबाबदारी सरदेसाई यांच्या हाती आहे. त्यामुळे ठाकरेंच्या घरात सरदेसाई यांचेच अधिक महत्व असल्याचे स्पष्ट होते.
राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केले. त्यामुळे शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेच्या अध्यक्ष पदाची धुरा अभिजित पानसे यांच्याकडे सोपवण्यात आली. पण पुढे विद्यार्थी सेनेची पाटी पुसून युवा सेनेची स्थापना केली आणि त्याचे अध्यक्ष पद हे आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आले. पण आदित्य ठाकरे हे युवा सेनेचे अध्यक्ष असले तरीही याचे सरचिटणीस हे वरुण सरदेसाई हे आहेत. वरुण सरदेसाई हे युवा सेनेची बांधणी करत आहेत. वरुण सरदेसाई शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या बहिणीचे पुत्र आहेत. म्हणजेच ते आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ आहेत. वरुण सरदेसाई यांच्याकडे शिवसेनेच्या युवासेनेची सचिवपदाची जबाबदारी आहे. तसंच वरुण यांच्याकडे शिवसेनेच्या आयटी सेलचीही जबाबदारी आहे.
(हेही वाचा – ठाकरे गटाचा मुंबईतील आणखी एक आमदार शिंदेंच्या गळाला?)
आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबाचा वरुण सरदेसाई यांच्यावर खूप विश्वास आहे. त्यामुळेच ठाकरे सरकारच्या काळात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहुतील आदिश निवासस्थानाबाहेर युवा सेनेचे आंदोलन हे वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वखालील यशस्वी केले होते आणि शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय केलेले हे युवा सेनेचे पहिले मोठे आंदोलन तथा मोर्चा होता. यावेळी मुंबई ठाकरेंची… मुंबई शिवसेनेची अशा घोषणा त्यांनी देत राणेंना ललकारण्याचा प्रयत्न केला होता.
त्यामुळे उबाठा शिवसेनेच्या युवा सेनेची बांधणी एका बाजूला वरुण सरदेसाई करत असताना दुसरीकडे मनविसेच्या संघटनेची बांधणी हे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांच्या सोबत प्रमुख संघटक यश सरदेसाई हे सांभाळताना दिसत आहेत. यश सरदेसाई हे मनसे नेते आणि माजी आमदार नितीन सरदेसाई यांचे पुत्र असून एवढे दिवस ते प्रत्यक्ष राजकारणात सक्रिय झाले नव्हते. मनविसेची जबाबदारी ही आदित्य राजन शिरोडकर यांच्याकडे होती. परंतु ते ऊबाठा शिवसेनेत गेल्याने मनविसेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी राज ठाकरे यांचे पुत्र अमित यांच्यावर सोपवून त्यांना राजकारणात सक्रिय करुन घेतले. त्यानंतर आता नितीन सरदेसाई यांनी आपल्या मुलाला राजकारणात आणून त्यांच्यावर मनविसेच्या प्रमुख संघटक पदाची जबाबदारी सोपवली. राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांपैकी नितीन सरदेसाई हे असून आता त्यांचे पुत्रही ठाकरे यांच्या पुढील पिढीचे विश्वासू सहकारी बनून त्यांच्या नेतृत्वाखाली मनविसे च्या माध्यमातून मनसेला अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न यश सरदेसाई यांच्यावतीने केला जात आहे. त्यामुळे दोन्ही ठाकरे यांच्या युवा नेत्यांना आता सरदेसाई हेच विश्वासू सहकारी लाभल्याचे दिसून येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community