Nitin Desai : एन.डी. स्टुडिओ शासनाच्या ताब्यात घेण्यापूर्वी कायदेशीर बाबी तपासणार – देवेंद्र फडणवीस

161

प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जतच्या एनडी स्टुडिओमध्ये आपले जीवन संपवले. विषयवार विधिमंडळात श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचा खुलासा केला. संबंधित स्टुडिओ शासनाने ताब्यात घ्यावा अशा स्वरूपाच्या बातम्या येत आहेत. त्याच्या कायदेशीर बाबी तपासून मग निर्णय घेतला जाईल. त्याचबरोबर कर्ज वसुलीसाठी त्यांच्यावर कोणी दबाव आणत होते का? ज्यादा व्याज लावले होते का?, याबाबींची सखोल चौकशी केली जाईल, अशी घोषणा फडणवीस यांनी केली

भाजपा आमदार आशिष शेलार यांनी नितीन देसाई यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस आमदार अशोक चव्हाण यांनी सभागृहात नितीन देसाई यांच्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. “नितीन देसाई यांनी मराठी चित्रपटात वेगळी छाप उमटवली. चांगला स्टुडिओ उभारला. चांगलं काम नितीन देसाई यांनी केलं. जे पाहतोय, ऐकतोय ऑडिओ क्लिपमधून त्यांनी पुरावे दिले आहेत. कर्ज वसुलीसाठी लोक जाचक पद्धतीने त्यांच्या मागे लागले होते का? असं इम्प्रेशन तयार झाले. आशिष शेलार यांनी मागणी केल्याप्रमाणे सखोल चौकशी झाली पाहिजे. लिलाव न करता शासनाने हा स्टुड़िओ ताब्यात घ्यावा, हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल” असं अशोक चव्हाण म्हणाले.

(हेही वाचा Nitin Desai : नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी ‘एआरसी एडेलवेस’ कंपनीची चौकशी होणार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.