मोबाईलचं कव्हर असणं हे खूप गरजेचं आहे. मोबाईल ही आपल्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाची गोष्ट झाली आहे. मोबाईलला कव्हर असणंही तितकंच गरजेचं आहे कारण मोबाईल हा जितका उपयोगी आहे तितकाच तो नाजूकही असतो. मोबाईल वापरताना बऱ्याचदा तो पडतो, कुठेतरी आपटला जातो तेव्हा मोबाईलचं जास्त नुकसान होऊ नये त्यासाठी आपण त्याला कव्हर घालतो. तसंच कव्हर घातल्यामुळे आपला मोबाईल फक्त सुरक्षितच नाही तर सुंदरही राहतो. पण हा सगळा विचार बाजूला ठेऊन मोबाईलच्या रेडीएशन्समुळे आपल्या शरीराला किती त्रास होऊ शकतो याचा विचार तुम्ही कधी केला आहे का?
राजस्थानमध्ये राहणाऱ्या एका माणसाने हा विचार केला आहे. हल्लीच्या काळात मोबाईल आपण फक्त हौशीपुरता वापरत नाही तर मोबाईल वापरणे ही आपली गरज झाली आहे. मोबाईलमधून घातक रेडीएशन्स बाहेर पडतात. ते शरीरासाठी वाईट असतात हे माहिती असताना देखील आपण मोबाईल वापरतोच. पण राजस्थान येथे राहणाऱ्या एका माणसाने मोबाईलच्या रेडीएशन्समुळे शरीराला नुकसान पोहोचू नये याकरिता चक्क गाईच्या शेणापासून मोबाईलचे कव्हर तयार केले आहे. या माणसाचे म्हणणे आहे की, या शेणाच्या कव्हरमुळे मोबाईलमधून येणारे रेडीएशन्स कव्हरच्या बाहेर येण्यापासून रोखले जातात.
(हेही वाचा PM Narendra Modi : विरोधकांपासून सावध रहा; गरिबांची कामे करा, पंतप्रधानांचा मित्र पक्षांना सल्ला)
सध्या इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. शेणापासून मोबाईलचे कव्हर तयार करणाऱ्या या व्यक्तीचं नाव आहे, गौ-वैज्ञानिक शिवदर्शन मलिक. त्यांचं असं म्हणणं आहे की, एरव्ही असाच मोबाईल वापरला असता त्या मोबाईलचे रेडीएशन्स मोबाईल वापरणाऱ्याच्या हातामधून शरीरात प्रवेश करतात. यामुळे शरीराचे खूप नुकसान होऊ शकते. पण शेणाच्या कव्हरमध्ये मोबाईल ठेवल्यानंतर त्या मोबाईलचे रेडीएशन्स कव्हरच्या बाहेर पडत नाहीत.
शिवदर्शन मलिक हे सध्या त्यांनी तयार केलेलं कव्हर टेस्ट करत आहेत. मलिक हे शेण, माती आणि इतर ऑरगॅनिक साहित्य मिसळून विटा तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ते केमिस्ट्रीचे प्रोफेसर होते. त्यांनी तयार केलेल्या गोक्रीट म्हणजेच विटा या रेडीएशन्स रोखण्यासाठी समृद्ध आहेत असा दावा ते करतात. म्हणून त्यांनी मोबाईलसाठी रेडीएशन्स रोखणारे कव्हर तयार केले आहे. सध्या त्या कव्हरची टेस्टिंग सुरू आहे असे शिवदर्शन मलिक हे प्रसिद्ध झालेल्या व्हिडीओमध्ये सांगताना आपल्याला दिसतात.
Join Our WhatsApp Community