गुरुवारी म्हणजे 3 ऑगस्ट रोजी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा 11 वा दिवस होता. दिल्ली सेवा विधेयक लोकसभेत मंजूर झाले. त्याचवेळी सभापती ओम बिर्ला यांनी आप खासदार सुशील कुमार रिंकू यांना उर्वरित अधिवेशनासाठी निलंबित केले. रिंकूंना निलंबित करण्याचा प्रस्ताव संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आणला होता. वेलमध्ये पेपर फाडल्याचा आरोप रिंकूंवर होता.
लोकसभेत दुपारी दोन वाजता दिल्ली अध्यादेश विधेयकावर चर्चा सुरू झाली. विरोधी पक्षांनी आघाडीचा विचार न करता दिल्लीचा विचार करावा, असे अमित शहा म्हणाले. एक मात्र नक्की की आपण कितीही आघाड्या केल्या तरी सरकार नरेंद्र मोदींच्याच हातात येईल. मणिपूरवर तुम्हाला हवी तेवढी चर्चा करा, मी उत्तर देईन, असेही शहा म्हणाले. गृहमंत्री बोलल्यानंतर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, शहा यांनी नेहरूंची केलेली स्तुती चांगली आहे. शहा म्हणाले की, मी स्तुती केली नाही. तुम्हाला तसे वाटत असेल तर तसे समजा.
(हेही वाचा NCC : ठाण्याच्या जोशी बेडेकर महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना मारहाण)
Join Our WhatsApp Community