Padma Awards : पद्म पुरस्कारांसाठी नावांची शिफारस करणाऱ्या समितीची स्थापना, मुनगंटीवार अध्यक्षपदी

समितीच्या अध्यक्षपदी सुधीर मुनगंटीवारांची वर्णी

176
Padma Awards : पद्म पुरस्कारांसाठी नावांची शिफारस करणाऱ्या समितीची स्थापना, मुनगंटीवार अध्यक्षपदी
Padma Awards : पद्म पुरस्कारांसाठी नावांची शिफारस करणाऱ्या समितीची स्थापना, मुनगंटीवार अध्यक्षपदी

पद्म पुरस्कारांच्या नावांची शिफारस करण्यासाठी केंद्र सरकारकडून पद्म-पुरस्कार-समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी सुधीर मुनगंटीवारांची वर्णी लागली आहे. तर, दिलीप वळसे पाटील, दादा भुसे, चंद्रकांत पाटील, धनंजय मुंडे, उदय सामंत आणि अप्पर मुख्य सचिव (राजशिष्टाचार) यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे.

वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या मान्यवरांची पद्म पुरस्कारांसाठी शिफारस करण्याचे निर्देश केंद्र शासनाने राज्य शासनाला दिले. २६ जानेवारी २०२४ रोजी घोषित करण्यात येणाऱ्या पुरस्कारांसाठी मान्यवरांच्या विविध माध्यमातून प्राप्त झालेल्या नावांची शहानिशा ही समिती करेल. त्यानंतर केंद्राकडे ही नावे पाठवण्यात येतील.

(हेही वाचा – BEST Strike : सलग तिसऱ्या दिवशी मुंबईत बेस्ट बसच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच)

केंद्र शासनाकडून स्थापन करण्यात आलेल्या पद्म-पुरस्कार-समितीचे प्रमुख मंत्रिमंडळ-सचिव असतात. तसेच, गृहसचिव, राष्ट्रपतींचे सचिव आणि चार ते सहा ख्यातनाम व्यक्तींना या समितीत समाविष्ट करण्यात येते. समितीने निवडलेल्या नामांकनातून पुरस्कारांसाठीची नावे निश्चित करुन ही नावे पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे मान्यतेसाठी पाठवली जातात.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.