केदारनाथ यात्रा मार्गावरील गौराकुंड या ठिकाणी शुक्रवार (४ ऑगस्ट) सकाळी दरड कोसळली. या दरडीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर, आसपासची दुकानेही मंदाकिनी नदीत वाहून गेली असल्याचे समजत आहे. तसेच उत्तराखंड येथील रुद्रप्रयाग येथे पूर आल्याने आणि दरड कोसळल्याने १३ लोक बेपत्ता झाले आहेत.
जिल्हा कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार १३ पैकी १२ लोकांची ओळख पटली आहे. या १२ जणांमध्ये ३ वर्षे ते १४ वर्षांच्या वयातील पाच मुलांचाही समावेश आहे. एसडीआरएफने दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये नेपाळी आणि स्थानिक नागरिकांचा समावेश आहे.
(हेही वाचा – Jalgaon Crime : जळगावमध्ये ७ वर्षीय मुलीवर अत्याचार करत तरुणाने केली हत्या; मृतदेह लपवला गोठ्यात)
घटनास्थळी उपस्थित असलेले पोलीस अधिकक्षक विमल रावत यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. तसेच काही ठराविक अंतराने काही भागांमध्ये कोसळत असलेल्या दरडीने बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. तर अतिवृष्टीमुळे मंदाकिनी नदीला पूर आला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community