नितीन देसाई आत्महत्या प्रकरण; बॉलिवूड कलाकारासह एडलवाईस कंपनी अधिकाऱ्यावर होणार गुन्हा दाखल

266
नितीन देसाई आत्महत्या प्रकरण; बॉलिवूड कलाकारासह एडलवाईस कंपनी अधिकाऱ्यावर होणार गुन्हा दाखल
नितीन देसाई आत्महत्या प्रकरण; बॉलिवूड कलाकारासह एडलवाईस कंपनी अधिकाऱ्यावर होणार गुन्हा दाखल

सुप्रसिद्ध मराठी कला दिग्दर्शक नितीन देसाईंच्या आत्महत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. देसाई यांच्या आत्महत्येला कोण जबाबदार आहे याचा तपास खालापूर पोलिसांकडून करण्यात येत आहे. लवकरच देसाई यांच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करतील असे एका वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी सांगितले.

कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुधवारी कर्जत येथील एन. डी. स्टुडिओमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी एन. डी. स्टुडिओमध्येच अंत्यसंस्कार करण्यात आले. देसाई यांनी मृत्युपूर्वी स्वतःच्या आवाजात ११ ऑडिओ क्लिप्स केल्या व त्या स्टुडिओतील विश्वासू कर्मचारी योगेश ठाकूर यांच्याकडे देऊन बहिणीला देण्यास सांगितल्या होत्या. देसाई यांच्या ऑडिओ क्लिप खालापूर पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून त्यातील काही ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी आत्महत्येचे कारण आणि त्याला जबाबदार व्यक्तीचे नावे घेतले आहे.

पोलीस सूत्रांच्या म्हणण्यानुसार, या ऑडिओ क्लिपमध्ये चार जणांची नावे असून, त्यातील एक नाव एडलवाईस कंपनीचे वरिष्ठ अधिकारी राशेस शहा आणि एक बॉलिवूड कलाकार असल्याचे समजते. या चौघांनी देसाईंचा मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. बॉलिवूड कलाकाराने देसाई यांना बॉलिवूडमध्ये काम मिळू न देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले असे बोलले जात आहे. तसेच देसाई यांनी स्टुडिओवर काढलेल्या कर्जासंबंधी एडलवाईस कंपनीचे वरिष्ठ अधिकारी राशेस शहा यांनी मानसिक त्रास दिल्याचे बोलले जात आहे. या सर्व प्रकरणाचा खालापूर पोलिसांकडून तपास सुरू असून लवकरच ऑडिओ क्लिप आधारे तसेच काही साक्षीदारांचे जबाब नोंदवून गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे समजते.

(हेही वाचा – Teeth Test : मुंबईसह पालघरमधील १२०० शाळकरी मुलांच्या दातांची तपासणी)

राशेस शहा यांची ईडीकडून झाली होती चौकशी

राशेस शहा हे एडलवाईस कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आहेत. मिरा रोड येथील फॉरेन्स करन्सी एक्सचेंज प्रकरणी ईडीकडून २०२० मध्ये चौकशी करण्यात आली होती. मिरारोडमधील एका कंपनीच्या घोटाळा प्रकरणात एडलवाईज ग्रुपच्या राशेस शाह यांचा ईडीने जबाब नोंदवला होता.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.