मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना दिलासा देणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा इमारतींच्या दुरुस्तीसाठी येणाऱ्या अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेत दिली.
मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारमतींच्या प्रश्नासंदर्भात विधानपरिषद सदस्यांनी मांडलेल्या भावनांचा सकारात्मक विचार केला जाईल. सध्या सुरु असलेल्या अधिवेशनात पुरवणी मागण्या मान्य झाल्या आहेत. त्यामुळे अधिवेशनानंतर म्हाडाच्या इमारत दुरुस्ती पुनर्रचना मंडळाकडील निधीचा आढावा घेतला जाईल. या मंडळाकडे निधी उपलब्ध असल्यास त्यातून दुरुस्तीची कामे करण्यात येतील. मात्र निधीची कमतरता असल्यास पुढील डिसेंबरच्या अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
(हेही वाचा Cancer : वीर सावरकरांच्या उच्च विचारांचा आधार घेवून मी कर्करोगावर मात केली – शरद पोंक्षे)
Join Our WhatsApp Community