राज्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात माणसे जखमी आणि मृत होण्याचे प्रमाण वाढत आहे. वाढत्या मानव वन्यजीव संघर्षावर सरकारने आता नुकसानभरपाईच्या किंमतीत वाढ केली आहे. वन्यप्राण्याच्या हल्ल्यात माणूस मृत्यू पावल्यास थेट 25 लाख नुकसानभरपाईची घसघशीत रक्कम दिली जाईल. सरकारी अध्यादेश जारी करत राज्य सरकारने ही घोषणा केली.
वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती, रानकुत्रे, नीलगाय आणि माकड यांच्याकडून माणसावर हल्ला झाल्यास राज्यात वनविभाग नुकसानभरपाई देते. सध्या विदर्भात चंद्रपुरात वाघांच्या वाढत्या हल्ल्यामुळे तणावाची परिस्थिती आहे. राज्यभरात बिबट्याच्या हल्ल्यात जखमींची संख्याही वाढत आहे. राज्यात मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात बिबट्याचे हल्ले वाढत आहेत.
(हेही वाचा Ashish Shelar : रशेष शाह यांचा बोलविता ‘धनी’ कोण? – ॲड. आशिष शेलार)
नुकसान भरपाईचे स्वरूप
- वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मृत व्यक्तीच्या कुटुंबीयाला तत्काळ 10 लाखांची रक्कम दिली जाईल.
- उर्वरित दहा लाखांची रक्कम मृताच्या वारसदारांना पाच वर्ष फिक्स डिपॉजिटमध्ये आणि पाच लाखांची रक्कम दहा वर्ष फिक्स डिपॉजिटमध्ये दिली जाईल.
- वन्यप्राण्याच्या हल्ल्यात कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 7 लाख 50 हजारांची रक्कम दिली जाईल.
- वन्यप्राण्याच्या हल्ल्यात माणूस गंभीररित्या जखमी झाल्यास पाच लाख रुपये दिले जातील.
- वन्यप्राण्याच्या हल्ल्यात किरकोळ जखम झाल्यास 25 हजारांची रक्कम दिली जाईल.