महाराष्ट्रातील ४४ रेल्वे स्थानके होणार आधुनिक, पंतप्रधान करणार व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उदघाट्न

५०८ रेल्वेस्थानकांच्या प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत

182
महाराष्ट्रातील ४४ रेल्वे स्थानके होणार आधुनिक, पंतप्रधान करणार व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उदघाट्न
महाराष्ट्रातील ४४ रेल्वे स्थानके होणार आधुनिक, पंतप्रधान करणार व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उदघाट्न

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते रविवार (६ ऑगस्ट) रोजी महाराष्ट्रातील ४४ रेल्वे स्थानकाच्या कामाचे उदघाट्न व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. अमृत भारत स्थानक योजने अंतर्गत देशभरातील १३०९ आणि महाराष्ट्रातील ४४ रेल्वेस्थानकांचा विमानतळाच्या धर्तीवर विकास करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. यापैकी ५०८ रेल्वेस्थानकांच्या प्रकल्पाची पायाभरणी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. त्यावर २४ हजार ४७० काेटी रुपये खर्च अपेक्षित आहे. २५ राज्यांत ५०८ स्थानके या माध्यमातून विकसित हाेतील.

महाराष्ट्रातील अहमदनगर, कोपरगाव, बडनेरा, धामणगाव, परळी वैजनाथ, मलकापूर, शेगाव, बल्लारशहा, चांदा फोर्ट, चंद्रपूर, वडसा, गोंदिया, हिंगणघाट, पूलगाव, सेवाग्राम, वाशिम, चाळीसगाव, हिंगोली, जालना, परतूर, कोल्हापूर, लातूर, मुंबई परेल, कांजूर मार्ग, विक्रोळी, काटोल (नागपूर), गोधनी, नरखेड, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), किनवट, मुखेड, मनमाड, नगरसोल, उस्मानाबाद (धाराशिव), गंगाखेड, परभणी, पूर्णा, सेलू, आकुर्डी, दौंड, तळेगाव, कुर्डूवाडी, पंढरपूर, सोलापूर या स्थानकांचा कायापालट होणार आहे.

(हेही वाचा – World University Games 2023 : ज्योती येराजीने राष्ट्रीय विक्रमासह जिंकलं कांस्य पदक)

प्रकल्पावर २४ हजार ४७० काेटी रुपये खर्च अपेक्षित आहे.आगामी ५० वर्षांची गरज लक्षात घेऊन या स्थानकांचा विकास केला जात आहे. त्यासाठी टेंडर काढण्यात आली आहेत. विकास कार्य अमृत भारत स्टेशन याेजनेअंतर्गत केले जात आहे. १३०० स्थानकांपैकी काही साेडल्यास सामान्यपणे स्थानक रेल्वे रुळाच्या केवळ एका बाजूने असल्याचे दिसून आले आहे. काही वर्षांत रेल्वे मात्र रेल्वे रुळाच्या दाेन्ही बाजूने शहर विकसित झाले आहे. त्यामुळे दाेन्ही बाजूने लाेक स्थानकावर येतात. त्यामुळेच दाेन्ही बाजूने स्थानक इमारतीला विकसित केले जाईल. अनेक शहरांत तर रेल्वेस्थानकाजवळच बसस्थानक, ऑटो स्टेशन व मेट्राेही आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकाजवळच वाहतुकीच्या इतर पर्यायांची एकीकृत व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बसस्थानक किंवा ऑटो टॅक्सी स्टँडशी रेल्वेस्थानकांना जाेडले जाण्याचे नियोजन केले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.