Prithvi Shaw : भारतीय फलंदाज पृथ्वी शॉ कसा झाला हिट-विकेट आऊट?

भारतीय फलंदाज पृथ्वी शॉ सध्या इंग्लिश काऊंटी स्पर्धेत खेळतोय. पण, एका सामन्यात शॉ विचित्र पद्धतीने आऊट झाला. सध्या सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

224
Prithvi Shaw : भारतीय फलंदाज पृथ्वी शॉ कसा झाला हिट-विकेट आऊट?

ऋजुता लुकतुके

भारताचा युवा फलंदाज पृथ्वी श़ॉ (Prithvi Shaw) सध्या इंग्लिश काऊंटी हंगामात नॉर्थॲम्पटनशायरकडून (Northampton) खेळतोय. काऊंटीसाठीच्या पदार्पणाच्या सामन्यातच शॉ अगदी विचित्र पद्धतीने बाद झाला. २३ वर्षीय शॉ चक्क हिट-विकेट (Hit-Wicket) झाला. एक उसळता चेंडू खेळताना त्याचा तोल गेला आणि आपल्या हाताने त्याने यष्ट्या उखडल्या. बाद होण्यापूर्वी शॉने ३४ धावा केल्या.

ज्या पद्धतीने तो बाद झाला तो व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होतोय.

इंग्लिश काऊंटी हंगामात सध्या प्रथमश्रेणी एकदिवसीय काऊंटी विश्वचषक (Domestic County ODI World Cup) सुरू आहे. यात नॉर्थम्पटनशायर विरुद्‌ध ग्लुसेस्टरशायर असा सामना सुरू होता. आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आपल्या संघाचा सलामीवीर होता. पॉल व्हॅन मीकिरेनचा एक उसळता चेंडू पूल करताना शॉचा फटका चुकला. बॅट चेंडूवर नीट बसली नाही. आणि शॉचा तोल मात्र गेला.

(हेही वाचा

शॉ (Prithvi Shaw) तर खाली पडलाच. शिवाय त्याची लाथ यष्ट्यांवर बसून तो स्वयंचित झाला. प्रतिस्पर्धी ग्लुसेस्टकशायर काऊंटीने हा क्षण आपल्या ट्टिटर अकाऊंटवर टाकल्यावर तो चांगलाच व्हायरल झालाय. या सामन्यात शॉच्या नॉर्थम्पटनशायर संघाला पराभव पत्करावा लागला.

एका फॅनने ट्विटरवर लिहिलंय की, “इंझमामका याद आगया !”

काहींनी शॉला (Prithvi Shaw) वजन कमी करण्याचा सल्ला दिला. तर काहींना शॉची तारांबळ पाहून ड्वेन लिव्हररॉक आठवला. काहींनी मात्र शॉचं बाद होणं तो कमनशिबी असल्याचं म्हटलं आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.